बाबुजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:12 IST2019-07-01T22:11:48+5:302019-07-01T22:12:16+5:30

ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्वर्गिय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दि.२ जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Blood Donation Camp today on the occasion of Babuji's birth anniversary | बाबुजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर

बाबुजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्वर्गिय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दि.२ जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूह व जिल्हा सामान्य रूग्णालय यांच्यावतीने करण्यात आले आहे.
सकाळी १०.३० वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयात रक्तदान शिबिराला सुरूवात होईल. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र व डोनर कार्ड देण्यात येणार आहे गडचिरोली जिल्ह्यात रक्ताची कायम टंचाई भासत असते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी नेहमीच पायपीट करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन लोकमत वृत्तपत्र समुहाकडून दरवर्षी बाबुजींच्या जयंतीला रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.
दुसºयाचा जीव वाचविण्यासाठी रक्तदानासारख्या महादानात नागरिकांनी तसेच लोकमत सखी मंचच्या सदस्यांनी सहभागी होऊन या सत्कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ.गणेश जैन, जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, सखीमंचच्या जिल्हा संयोजिका रश्मी आखाडे यांनी केले आहे.

Web Title: Blood Donation Camp today on the occasion of Babuji's birth anniversary