‘लोकमत’तर्फे २ जुलैला हाेणार रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2022 05:00 IST2022-06-30T05:00:00+5:302022-06-30T05:00:16+5:30

दोन्ही कार्यक्रम धानोरा मार्गावरील प्रेस क्लब भवनात होणार आहेत. सकाळी ९.३० वाजता प्रेस क्लब भवनात बाबूजींच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून रक्तदानाला सुरुवात होईल. जिल्हा सामान्य रुग्णालयाची चमू हे रक्त संकलन करणार असून, ते गरजूंना दिले जाणार आहे. या दरम्यान, सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रेस क्लबमध्ये येऊन बाबूजींच्या प्रतिमेसमोर पुष्पार्पण करून आदरांजली वाहतील. 

Blood donation camp to be held on 2nd July by Lokmat | ‘लोकमत’तर्फे २ जुलैला हाेणार रक्तदान शिबिर

‘लोकमत’तर्फे २ जुलैला हाेणार रक्तदान शिबिर

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि राज्याचे माजी आरोग्य व उद्योगमंत्री जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ जुलैला गडचिरोलीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यासोबतच बाबूजींना शहरातील विविध मान्यवरांकडून आदरांजली वाहिली जाणार आहे. 
हे दोन्ही कार्यक्रम धानोरा मार्गावरील प्रेस क्लब भवनात होणार आहेत. सकाळी ९.३० वाजता प्रेस क्लब भवनात बाबूजींच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून रक्तदानाला सुरुवात होईल. जिल्हा सामान्य रुग्णालयाची चमू हे रक्त संकलन करणार असून, ते गरजूंना दिले जाणार आहे. या दरम्यान, सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रेस क्लबमध्ये येऊन बाबूजींच्या प्रतिमेसमोर पुष्पार्पण करून आदरांजली वाहतील. 
रक्तदान शिबिरात विविध संघटनांनी सहभागी होऊन, या सामाजिक कार्यात आपला हातभार लावावा, असे आवाहन ‘लोकमत’ समूहाच्या वतीने जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ.गणेश जैन, जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, इन्व्हेंट संयोजिका रश्मी आखाडे यांनी केले आहे.

 

Web Title: Blood donation camp to be held on 2nd July by Lokmat