बाबुजींच्या जयंतीनिमित्त सोमवारी रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:01 IST2018-06-28T23:59:35+5:302018-06-29T00:01:18+5:30

जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै २०१८ रोजी सोमवारी जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथील रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Blood donation camp on Monday for Babuji's birth anniversary | बाबुजींच्या जयंतीनिमित्त सोमवारी रक्तदान शिबिर

बाबुजींच्या जयंतीनिमित्त सोमवारी रक्तदान शिबिर

ठळक मुद्देलोकमत वृत्तपत्र समुहाने गडचिरोली येथील सामान्य रूग्णालयात रक्तदान शिाबिराचे आयोजन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै २०१८ रोजी सोमवारी जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथील रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्त रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूह व जिल्हा सामान्य रूग्णालयाच्यावतीने करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र व कार्ड देण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात रक्ताची कायम टंचाई राहत असते. त्यामुळे रूग्णांना व नातेवाईकांना रक्तासाठी पायपीट करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन लोकमत वृत्तपत्र समुहाने गडचिरोली येथील सामान्य रूग्णालयात रक्तदान शिाबिराचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाला लोकमत सखीमंच, लोकमत युवा नेक्स्टच्या सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सकाळी १०.३० वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयात रक्तदान शिबिराला सुरूवात होईल. या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन, जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने यांनी केले आहे.

Web Title: Blood donation camp on Monday for Babuji's birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.