गडचिरोलीत ११ ला पुन्हा रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:24 IST2021-07-08T04:24:49+5:302021-07-08T04:24:49+5:30

गडचिरोली : राज्यभरातील गरजवंतांसाठी ५० हजार रक्त युनिट गोळा करण्याचा संकल्प करत सामाजिक जाणिवेतून लोकमतने सुरू केलेल्या रक्तदान शिबिरांना ...

Blood donation camp again on 11th at Gadchiroli | गडचिरोलीत ११ ला पुन्हा रक्तदान शिबिर

गडचिरोलीत ११ ला पुन्हा रक्तदान शिबिर

गडचिरोली : राज्यभरातील गरजवंतांसाठी ५० हजार रक्त युनिट गोळा करण्याचा संकल्प करत सामाजिक जाणिवेतून लोकमतने सुरू केलेल्या रक्तदान शिबिरांना सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ जुलैपासून ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चौथे रक्तदान शिबिर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने आयोजित केले असून हे शिबिर येत्या ११ जुलै रोजी बँकेच्या सभागृहात होणार आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांच्या हस्ते आणि नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र चौधरी, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १० वाजता शिबिराला सुरुवात होईल. या शिबिरात जिल्हा बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह इतरही रक्तदात्यांना रक्तदान करता येईल.

यापूर्वी गडचिरोलीतील पोलीस रुग्णालय, आरमोरीत साई नर्सिंग स्कूल आणि चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात अशी तीन शिबिरे झाली आहेत. दि.११ च्या गडचिरोलीतील शिबिरानंतर अहेरीत रक्तदान शिबिर होणार आहे.

चामोर्शीतील रक्तदात्यांची नावे

ओ पॉझिटिव्ह- बिपीन शेवाळे, पांडुरंग कांबळे, रोशन थोरात, चंद्रशेखर गमपल्लीवार, सुमीत गायकवाड, कार्तिक पाऊलबुदे, विश्वास नखाते, बंडू बारसागडे, ज्ञानेश्वर लाकडे, महेश कोठारे, सुधीर भांडेकर, शंतनू पिपरे, सुरेश तांगडे, विशाल कायंदे, चंद्रकांत गव्हारे, सूरज शिवनीवार, शुभम कागदेलवार

बी पॉझिटिव्ह - ओमप्रकाश साखरे, नागेश मादेशी, सोनू वाळके, विवेक दुधे, कुलदीप कुकुडकर, माधुरी बर्लावार, हेमचंद भांडेकर, राहुल पेंदोरकर, संदीप बारसागडे, विजय दहीफडे

ए पॉझिटिव्ह - विजय केंद्रे, राकेश सोमनकर, चैताली चांदेकर, राकेश खेवले, नागनाथ पाटील, स्नेहा मांडाले, कुशल कवडेकर

एबी निगेटिव्ह - भास्कर आढाव

एबी पॉझिटिव्ह - प्रवीण रहंदे, मंगेश दडमल, शुभम त्यागलवार

Web Title: Blood donation camp again on 11th at Gadchiroli