भाजपच्या योगिता भांडेकर गडचिरोली जिपच्या अध्यक्षपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2017 17:16 IST2017-03-21T17:16:51+5:302017-03-21T17:16:51+5:30
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या योगीता मधुकर भांडेकर तर उपाध्यक्षपदी आदिवासी विद्यार्थी संघाचे अजय कंकडालवार

भाजपच्या योगिता भांडेकर गडचिरोली जिपच्या अध्यक्षपदी
>ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. 21 - गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या योगीता मधुकर भांडेकर तर उपाध्यक्षपदी आदिवासी विद्यार्थी संघाचे अजय कंकडालवार विजयी झाल्या आहेत. ५१ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत योगीता भांडेकर यांना ३३ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या मनिषा दोनाडकर यांना १८ मते मिळाली. तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अजय कंकडालवार यांना ३३ तर काँग्रेसच्या रूपाली पंदीलवार यांना १८ मते मिळाली. या जिल्हा परिषदेत भाजपसोबत राष्टÑवादी काँग्रेस व माजी आमदार दीपक आत्राम यांचा आदिवासी विद्यार्थी संघ यांच्यासह एक अपक्ष सदस्याची आघाडी तयार झाली आहे. भाजपचे २०, राकाँचे ५, आविसंचे ७ व एक अपक्ष असे ३३ सदस्य आहेत. काँग्रेससोबत काँग्रेसचे १५, ग्रामसभेचे दोन व रासपचा एक सदस्य मतदानाला हजर होता.