शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

ग्रामपंचायतीतही भाजपचेच वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:12 AM

जिल्ह्यात २६ ग्रामपंचायतींपैकी १६ ठिकाणच्या सरपंचपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर २ ठिकाणी भाजप समर्थित उमेदवार विजयी झाले.

ठळक मुद्दे१६ सरपंचपद पटकावले : आविसंला पाच जागांवर यश, काँग्रेस-राष्टÑवादीची पकड सैल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात २६ ग्रामपंचायतींपैकी १६ ठिकाणच्या सरपंचपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर २ ठिकाणी भाजप समर्थित उमेदवार विजयी झाले. आदिवासी विद्यार्थी संघालाही ५ ठिकाणी आपले सरपंच निवडून आणण्यात यश आले. मात्र काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस किंवा शिवसेना या मोठ्या पक्षांना उल्लेखनिय असे मोठे यश मिळाले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात त्यांची पकड अजूनही सैल असल्याचे स्पष्ट झाले.कोरची तालुक्यातील बोगाटोला येथे सात जागांपैकी पाच जागांसाठीच पाच उमेदवारांचे नामांकन आले होते. त्यामुळे ते पाच सदस्य अविरोध निवडून आले. उर्वरित दोन सदस्य व सरपंचपदासाठी नामांकनच भरण्यात आले नाही. धानोरा तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य अविरोध निवडून आले आहेत. त्या ठिकाणी भाजपने बाजी मारली. त्यामुळे उर्वरित २४ ग्रामपंचायतींसाठीच सोमवारी प्रत्यक्षात मतदान झाले. मंगळवार दि.१७ ला संबंधित तालुक्याच्या मुख्यालयी मतमोजणी झाली.पहिल्यांदाच सरपंचाची निवड थेट नागरिकांमधून होणार असल्यामुळे सर्वांनात त्याबाबत उत्सुकता होती. ही निवडणूक पक्षीय चिन्हावर होणार नसली तरी अनेक राजकीय पक्षांनी सरपंचपद पटकावण्यासाठी आपापल्या कार्यकर्त्यांना बळ दिले होते. अनेक ठिकाणी नेतेमंडळीही प्रचारात उतरली होती. त्यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता होती. २४ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी ७० व ग्रामपंचायत सदस्यपदासाठी एकूण ३४९ उमेदवार रिंगणात होते.गडचिरोलीतालुक्यातील कोटगल येथील ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून भारत खोब्रागडे निवडून आले आहेत. राजोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नरेंद्र कन्नाके तर सदस्य म्हणून प्रदीप पोटावी, प्रमोद फुलझेले हे निवडून आले आहेत. तीन सदस्य यापूर्वीच अविरोध निवडले आहेत.कुरखेडातालुक्यातील कुंभीटोला ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक शिवसेना समर्थित उमेदवार किरण तलांडे यांनी काँग्रेस समर्थित उमेदवार मधुकर गावडे यांचा १५ मतांनी पराभव केला. भाजप समर्थित उमेदवार परसराम मडावी यांना अवघ्या ४६ मतांवर समाधान मानावे लागले. येथील सात सदस्यांपैकी पाच जागेवर शिवसेना समर्थित, दोन ठिकाणी काँग्रेस समर्थित उमेदवारांचा विजय झाला. प्रभाग क्र. १ मधून नवनाथ मडावी,लता सहारे, प्रभाग क्र. २ मधून सेनेचे काशिराम पोरेटी, सोनाबाई मडावी, प्रभाग ३ मधून सेनेचे काशिराम जनबंधू व काँग्रेसच्या उर्मिला हलामी, लता कापगते या निवडून आल्या. निवडणूक निकालाची घोषणा होताच शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, नगराध्यक्ष डॉ. महेंद्र मोहबंशी, आशिष काळे, नवनाथ धाबेकर, माजी जि.प. सदस्य निरांजनी चंदेल, पुंडलिक देशमुख, नरेंद्र तिरणकर यांनी आनंदोत्सव साजरा केला. नवेझरी ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून शुभेच्छा नैताम या विजयी झाल्या आहेत. त्या पं. स. सदस्य दुग्गा यांच्या गटाच्या आहेत.सिरोंचासिरोंचा तालुक्यातील जाफ्राबाद ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून सडमेक बापू पापय्या निवडून आले आहेत. तुमनूर येथे गुरूसिंग किष्टय्या रामय्या, बेजुरपल्लीत वेलादी सुशिला मल्ला, नेडीकुडात कोवरी शशिला सडवली, वडधम येथे मड्डे काटी मासा, मादाराम रै येथे गावडे सरिता सारा, सोमनपल्ली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तलांडी सरोजनी बसवय्या हे निवडून आले आहेत. जाफ्राबाद ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणून जाडी रोशक्का नारायण, दुर्गम कुसूमा मलय्या, दुर्गम तिरूपती बानय्या, पोरतेटी गट्टू नानय्या, गावडे सुजाता दुगर्या, कारसपल्ली सपना तिरूपती, आत्राम आनंदराव शंकर, आत्राम सुनीता नरेश, डोंगरे यलक्का लचय्या, सडमेक बापू पापय्या, नैताम सालुबाई रामय्या हे निवडून आले आहेत. बेजुरपल्ली ग्रामपंचायतीचे सदस्यपदी वेलादी क्रिष्टा लच्चा, डुरके ज्योती दिवाकर, मडे कारका दसा, गावडे रामे मारा, मंजूम पद्मा लिंगलू, वेलादी कारे लच्चा यांची निवड झाली आहे. नडीकुडा ग्रामपंचायत सदस्यपदी कावेरी सरिता अर्जय्या, जनगाम तिरूपती रामलू, गजेला पुष्पा सतीश या निवडून आल्या आहेत. तुमनूर माल ग्रामपंचायतीचे सदस्य गुरूसिंग किष्टय्या रामय्या, वेमुला बबीता किरण, दुर्गम सुजाता व्यंकटेश्वर, पिठेला लसमय्या मदनय्या, मडे लक्ष्मी लक्ष्मीनारायण, सोदारी कांताराम पोचम, सिडाम कल्याणी रामलू या निवडून आल्या आहेत. वडधन ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी पाली विजा मिच्चा, जेटी मलय्या पेंटय्या, चिंतल राजन्ना पेंटय्या, आकलू नागराणी मल्लीकार्जुन, गुरम राजमनी मलय्या, आत्राम मधुकर एडका, मडे काठी मासा हे निवडून आले आहेत. मादाराम (रै.) ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी आत्राम ललीता श्रीनिवास, दुर्गम गणेश राजम, भंडारी विजयलक्ष्मी रवींद्र, कावरे सुजाता तिरूपती, कोरेत दिवाकर बानय्या, जंगा सुरेश नानी, कुळमेथे सिरिया लच्चा, ओडेरी कोरिया संपत्ती, मडे इरि लिंगा या निवडून आल्या आहेत. सोमनपल्ली ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी कुमरी नीला चिरंजीव, तोरेम गणपत मलय्या, आसम पुष्पलता देवाजी, गावडे रवींद्र गणपती, संडेकी राधा बुचम, गावडे रमेश चनय्या, वेलादी चंद्रा सालय्या हे निवडून आले आहेत.अहेरीतालुक्यातील वट्रा खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आत्राम रवींद्र लचमय्या हे निवडून आले आहेत. सदस्यपदी मेडपल्ली शंकर नानी, पेंदाम सुलोचना मुतन्ना, आत्राम ललीता शंकर, कोरेत व्यंकटू चिन्नू, आत्राम रवींद्र लचमय्या, आत्राम सुनीता सुधाकर, हे निवडून आले आहेत. वांगेपल्ली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आत्राम पुष्पा ईश्वर तर सदस्यपदी मडावी दिलीप लालू, झाडे देवकी गौतम, गावडे प्रेमिला प्रवीण, आलाम रेखा बाबुराव, गावडे सुरेश नामदेव, तोरेम स्वरूपा राकेश, तोडसा निकिता सोमाजी, मडावी प्रभाकर विजय हे निवडून आले आहेत.आरमोरीतालुक्यातील सुकाळा ग्रामपंचायतीमधील एकूण सात सदस्यांपैकी सहा जागांवर भाजपाने विजय मिळविला आहे. सरपंचपदी भाजपच्या भाविंद्र नानाजी कन्नाके या विजयी झाल्या. सदर निवडणूक मानापूर-वैरागड क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य संपत आळे व जि. प. सदस्य भाग्यवान टेकाम यांच्या नेतृत्वात लढण्यात आली. कोजबी ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपच्या वैशाली रामदास डोंगरवार या निवडून आल्या आहेत. येथील बँकेचे संचालक डॉ. दुर्वेश भोयर व पं. स. सदस्य विवेक खेवले यांच्या नेतृत्वात लढण्यात आली. भाजप नेते प्रकाश पोरेड्डीवार व आ. कृष्णा गजबे यांच्या मार्गदर्शनात निवडणूक लढल्याने विजय प्राप्त झाला.आदिवासी विद्यार्थी संघाचे वर्चस्व वाढलेसिरोंचा, अहेरी तालुक्यात आपले वर्चस्व कायम ठेवून ते सतत वाढवत असलेल्या आदिवासी विद्यार्थी संघाने ८ ठिकाणी सरपंचपदाचे उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ५ जागा निवडून आणण्यात त्यांना यश आले. माजी आमदार दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात आणि जि.प.चे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात आविसंने हे यश मिळविले.आविसंने अहेरी तालुक्यात वटरा येथे सरपंचासह सदस्यपदांवरही बाजी मारली. तिथे भाजप-राष्टÑवादी युती होती. वांगेपल्ली येथे प्रथमच निवडणूक लढविताना सदस्यत्वाच्या ९ पैकी ६ जागा पटकावल्या. वडधम येथे सरपंचपद थोडक्यात हुकले. एटापल्ली तालुक्यातील तोडसा येथेही सरपंचपद थोडक्यात हुकले.सिरोंचा तालुक्यात जाफराबाद, मादाराम, तुमनूरमाल, सोमनपल्ली या चार ग्रामपंचायतींवर आविसंने यश मिळविले. या ठिकाणी भाजप, नाविस, राष्टÑवादी, काँग्रेस, बसपा अशी युती होती. तरीही आविसंने मिळविलेले हे यश मिळविल्याने त्यांची पकड वाढल्याचे दिसून येते.