शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
3
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
6
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
7
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
14
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
15
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
16
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
18
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
19
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
20
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकारचे ओबीसींच्या प्रश्नावर घूमजाव

By admin | Updated: January 5, 2015 23:04 IST

लोकसभा निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे आहे, असा प्रचार करण्यात आला. विधानसभा निवडणुकीतही ओबीसींना न्याय देऊ

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे आहे, असा प्रचार करण्यात आला. विधानसभा निवडणुकीतही ओबीसींना न्याय देऊ अशी भूमिका घेण्यात आली. मात्र सत्तेवर येताच भाजप सरकारने ओबीसींच्या मुद्यावरून घुमजाव केले आहे, असा आरोप ओबीसी समाज संघटनेचे अध्यक्ष रमेश मडावी यांनी केला आहे.
गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात ओबीसी समाज संघटनेच्यावतीने आयोजित एक दिवशीय धरणे कार्यक्रमात ते बोलत होते. या धरणे आंदोलनात रमेश मडावी, प्रा. अशोक लांजेवार, भास्कर राऊत, केशव सामृतवार, यदुनाथ चापले, वामन राऊत, हिराजी कुकडकार, इश्वर नैताम, विजय वैरागडे, गांधीजी कुकुडकार, चिंतामन धंदरे, शरद मंडलवार, मुर्लीधर सिडाम आदी उपस्थित होते. यावेळी ओबीसी व भटक्या विमुक्त प्रवर्गातील जनतेचे स्वतंत्र जातनिहाय जनजगणना करण्यात यावी, गडचिरोली जिल्ह्यामध्ये ९ जून २०१४ चे राज्यपालाची अधिसूचना अध्यादेशामध्ये सुधारणा करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना वर्ग ५ वीपासून शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी, तसेच ओबीसी विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमात १०० टक्के शिष्यवृत्ती द्यावी, क्रिमीलेअर मर्यादा ६ लाख रूपये झाल्यास शासन निर्णय असतानाही ३१ आॅगस्ट २०१३ ला सामाजिक न्याय विभागाने फक्त शिष्यवृत्तीसाठी काढलेले ४.५ लाखाचे परिपत्रक तत्काळ रद्द करावे आदी २८ मागण्या शासनाकडे करण्यात आल्या. (जिल्हा प्रतिनिधी)