बिरसा मुंडांच्या वंशजांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 01:36 IST2018-03-07T01:36:42+5:302018-03-07T01:36:42+5:30

आदिवासी दैवत भगवान बिरसा मुंडा यांचे नातू व पणत्या आलापल्ली येथे आले. यानिमित्त आलापल्ली येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.

 Birsa Munda felicitated | बिरसा मुंडांच्या वंशजांचा सत्कार

बिरसा मुंडांच्या वंशजांचा सत्कार

ठळक मुद्देआलापल्लीत कार्यक्रम : पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी

ऑनलाईन लोकमत
आलापल्ली : आदिवासी दैवत भगवान बिरसा मुंडा यांचे नातू व पणत्या आलापल्ली येथे आले. यानिमित्त आलापल्ली येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आलापल्ली, गोंड समाजाची शेंडिया भिकाजी मडावी, सीआरपीएफचे कमाडंट भगत होते. या कार्यक्रमादरम्यान बिरसा मुंडा यांचे नातूू सुखराम मुंडा व बुधराम मुंडा, त्याचबरोबर पंत्या जौनी मुंडा व चम्पा मुंडा यांचा सत्कार करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात पारंपरिक रेला नृत्याने मुंडा कुटुंबाचे स्वागत करण्यात आले. आलापल्लीचे सरपंच सुनंदा मडावी व सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आलापल्ली येथील वीर बाबुराव शेडमाके व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. सलुजा, रोमित तोंबर्लावार, स्वप्नील श्रीरामवार, एल.एन. कुमरे यांनी सहकार्य केले.

Web Title:  Birsa Munda felicitated