कोट्यवधींचे मुद्रांक शिल्लक

By Admin | Updated: April 23, 2015 23:57 IST2015-04-23T23:57:20+5:302015-04-23T23:57:20+5:30

अनेक शासकीय कामांसाठी मुद्रांक न लावताच काम होत असल्याने मुद्रांकाची मागणी मागील काही दिवसांपासून घटली आहे.

Billions of stamps left | कोट्यवधींचे मुद्रांक शिल्लक

कोट्यवधींचे मुद्रांक शिल्लक

लोकमत विशेष
दिगांबर जवादे गडचिरोली
अनेक शासकीय कामांसाठी मुद्रांक न लावताच काम होत असल्याने मुद्रांकाची मागणी मागील काही दिवसांपासून घटली आहे. त्यामुळे कोट्यवधी रूपयांचे मुद्रांक जिल्हा कोषागार कार्यालयात शिल्लक आहेत. केंद्र सरकारने सेल्फ अटॅस्टेशन लागू केल्यामुळे आता नागरिकांनी मुद्रांक खरेदी थांबविली असल्याचे दिसून येत आहे.
शासकीय कार्यालयांच्या वतीने अनेक जनतेच्या हिताची कामे केली जातात. यावर राज्य शासनाचे कोट्यवधी रूपये खर्च होतात. स्टॅम्पच्या माध्यमातून शासनाकडे महसूल जमा व्हावा या उद्देशाने मुद्रांकाचा वापर केला जातो. यामध्ये सर्वाधिक मागणी न्यायीकेत्तर मुद्रांकाची राहते. २०१३-१४ या आर्थिक वर्षात मागणी करण्यात आलेल्या एकूण मुद्रांकापैकी चार कोटी ९५ लाख ९९ हजार ८३० रूपयांचे मुद्रांक शिल्लक होते. त्यानंतर २०१४-१५ या वर्षात १३ कोटी ८४ लाख ६२ हजार ३९ रूपयांच्या मुद्रांकाची मागणी करण्यात आली होती. यामध्ये १०० रूपये किमतीचे दोन लाख २० हजार मुद्रांक एक हजार रूपयाचे १० हजार, पाच हजार रूपय किमीचे सहा हजार व १० हजार रूपये किमतीचे एक हजार मुद्रांक मागण्यात आले. एक एप्रिल २०१४ ला शिल्लक असलेले मुद्रांक व २०१४-१५ या वर्षातील मुद्रांक असे एकूण १८ कोटी ८० लाख ६१ हजार ८६९ रूपयांचे मुद्रांक कोषागार कार्यालयाकडे जमा झाले. त्यापैकी २०१४-१५ या वर्षात ११ कोटी ९३ लाख ९२ हजार ६२९ रूपयांचे मुद्रांक विकण्यात आले व ३१ एप्रिल २०१५ रोजी जिल्हा कोषागार कार्यालयात सहा कोटी ८६ लाख ६९ हजार २३० रूपयांचे मुद्रांक शिल्लक होते.
२०१४-१५ या वर्षात तीन हजार ७१८ रूपयांचे विशेष चिकट मुद्रांक विकण्यात आले. एक लाख नऊ हजार ३०० रूपयांचे मुद्रांक शिल्लक आहेत. १ एप्रिल २०१४ ला मागील वर्षाचे एक लाख ८२ हजार ४० रूपयांचे मुद्रांक शिल्लक होते. २०१४-१५ या वर्षात ७७ हजार ६६० रूपयांची मागणी करण्यात आली. शिल्लक व प्राप्त मुद्रांकापैकी ५९ हजार ४३० रूपयांचे मुद्रांक विक्री करण्यात आले. एक लाख ८१ हजार ५० रूपयांचे मुद्रांक शिल्लक आहेत.
न्यायालयीन कामासाठी न्यायीक मुद्रांकाचा वापर केल्या जातो. या मुद्रांकाच्या माध्यमातून न्यायालयाचे शुल्क भरल्या जाते. १ एप्रिल २०१४ रोजी ७१ लाख २३ हजार रूपयांचे मुद्रांक शिल्लक होते. मोठ्या प्रमाणात मुद्रांक शिल्लक असल्याने २०१४-१५ या वर्षात मागणीच करण्यात आली नाही. २०१४-१५ या वर्षात केवळ १८ लाख ७० हजार ४५० रूपयांचे मुद्रांक विकण्यात आले. अजुनही जिल्हा कोषागार कार्यालयाकडे ५० लाख २३ हजार ८४० रूपयांचे न्यायीक मुद्रांक शिल्लक आहेत.
विशेष चिकट मुद्रांक कोर्ट फी, न्यायीक मुद्रांक व न्यायीकेत्तर मुद्रांक असे एकूण सात कोटी ३९ लाख ८३ हजार ४२० रूपयांचे मुद्रांक कार्यालयाकडे शिल्लक आहेत.
१०० रूपयांच्या स्टॅम्पची मागणी सतत वाढतीवर
न्यायीकेत्तर मुद्रांकामध्ये १०० रूपयांच्या मुद्रांकाचा सर्वाधिक वापर केल्या जातो. २०१४-१५ या वर्षात १०० रूपये किमतीचे सुमारे एक कोटी ९८ लाख ५९ हजार ७०० रूपयांचे मुद्रांक विकण्यात आले. बऱ्याचवेळा तहसील कार्यालयातील मुुद्रांक विक्रेते १०, २० व ५० च्या मुद्रांकाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून १० रूपयांच्या कामासाठी १०० रूपयांचे मुद्रांक घ्यायला लावतात. त्यामुळे ही १०० रूपयांच्या मुद्रांकाची मागणी वाढते.
न्यायिकेत्तर मुद्रांकाचा सर्वाधिक उपयोग

न्यायीकेत्तर मुद्रांक हे विद्यार्थी, सामान्य नागरिकाच्या शासकीय कामांसाठी वापरले जातात. त्यामुळे या मुद्रांकाची सर्वाधिक मागणी राहते. २०१४-१५ या वर्षात ११ कोटी ९३ लाख ९२ हजार ६३९ रूपयांचे मुद्रांक विकण्यात आले. २०१४-१५ मधील ५० रूपयांचे एकही मुद्रांक कार्यालयाकडे शिल्लक नाही.

Web Title: Billions of stamps left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.