शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

अनियंत्रीत दुचाकीची कारला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 5:10 PM

अनियंत्रीत दुचाकी समोरून येणाऱ्या कारवर जाऊन धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

गडचिरोली : दुचाकी आणि कारच्या धडकेत एक युवक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. ही घटना धानोरा पेंढरी रोडवर पुलकल गावजवळ घडली.

रुपेश रामदास आवळे (३०, रा धानोरा) असे मृतकाचे नाव आहे. रुपेश दुचाकीने पेंढरी येथे आपल्या बहिणीचे घरी राहून तेथील राईसमिल मध्ये काम करीत होता. त्याचे कुटुंब धानोरा येथे असल्याने तो तीळसंक्रातनिमित्त तो दुचाकीने (एम एच ३३ एन ४२६७) धानोरा येथे जाण्यास निघाला. दरम्यान, पुलकल गावाजवळ त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून दुचाकी समोरून येणाऱ्या कारला जाऊन धडकली. या घटनेत रुपेशचा जागीच मृत्यू झाला.

रुपेशची दोन लहान मुली बाबा घरी येणार असल्याने व संक्रात सण घरी मिळून साजरी करणार म्हणून खुशीत होते. परंतु वाटेतच अपघात होऊन रुपेश कायमचा निघून गेला. या घटनेची माहिती मिळताच कुटूंबियांवर शोककळा पसरली. या घटनेचा अधिक तपास पेंढरी पोलीस करीत आहेत

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू