बाईक चोरट्याला सामाजिक सुरक्षा विभागाने ठोकल्या बेड्या
By दयानंद पाईकराव | Updated: May 22, 2024 16:21 IST2024-05-22T16:20:37+5:302024-05-22T16:21:02+5:30
Nagpur : आरोपीला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केले गजाआड

Bike thief arrested by social security department
नागपूर : बाईक चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गजाआड केले आहे.
नरेंद्र उर्फ पप्पु फुलसिंग यादव (२६, रा. दुर्गानगर, कळमना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १३ मे रोजी सकाळी ६ वाजता शोभाराम मनिराम नवरे (२२, रा. समतानगर) यांच्या पुतण्याने आपली दुचाकी क्रमांक एम. एच. ४९, एल-१९७२ किंमत २० हजार पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत कमाल टॉकीज जवळील फायर ऑफिससमोर उभी करून कामाला गेले होते.
अज्ञात आरोपीने त्यांची दुचाकी चोरी केल्याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून त्यांनी तांत्रीक तपास करून आरोपी नरेंद्रला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरी केलेली दुचाकी जप्त करण्यात आली. आरोपीला पाचपावली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.