शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

बस्तरमध्ये 'लाल दहशती'ला मोठा हादरा ! १०८ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

By संजय तिपाले | Updated: March 11, 2026 15:41 IST

Gadchiroli : छत्तीसगडमधील बस्तरमध्ये नक्षलवादाच्या मुळावर घाव घालण्यात सुरक्षा दलांना मोठे यश आले आहे. ११ मार्च रोजी 'पुनर्वसन ते पुनरुत्थान' या मोहिमेतंर्गत तब्बल १०८ नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून सामूहिक आत्मसमर्पण केले.

​लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : छत्तीसगडमधील बस्तरमध्ये नक्षलवादाच्या मुळावर घाव घालण्यात सुरक्षा दलांना मोठे यश आले आहे. ११ मार्च रोजी 'पुनर्वसन ते पुनरुत्थान' या मोहिमेतंर्गत तब्बल १०८ नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून सामूहिक आत्मसमर्पण केले. या सर्वांवर तब्बल ४ कोटी रुपयांचे बक्षीस होते. जगदलपूर येथील पोलिस समन्वय केंद्र 'शौर्य भवन' येथे दुपारी २ वाजता हा ऐतिहासिक आत्मसमर्पण सोहळा पार पडला. बस्तर विभागातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, केंद्रीय सुरक्षा दलाचे कमांडर आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या नक्षलवाद्यांनी आपली शस्त्रे खाली ठेवली. यावेळी सर्वांसमोर त्यांनी नक्षलवादाला कायमचा रामराम ठोकला. ​या सामूहिक आत्मसमर्पणानंतर बस्तरमधील नक्षली संघटनांच्या 'दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी'ला (डीकेएसझेडसी) मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

​जिल्हानिहाय आत्मसमर्पित नक्षलवादी असे....

आत्मसमर्पण केलेल्या १०८ नक्षलवाद्यांमध्ये बस्तर विभागातील विविध जिल्ह्यांतील जहाल नक्षलवाद्यांचा समावेश आहे.​बिजापूर: ३७,​दंतेवाडा: ३०, सुकमा: १८, बस्तर: १६, नारायणपूर: ०४, कांकेर: ०३ अशी जिल्हानिहाय संख्या आहे.

​सरकारच्या धोरणाचा प्रभाव

बस्तरमध्ये सध्या नक्षलवाद्यांविरुद्ध 'ऑपरेशन प्रहार' आणि इतर मोहिमा तीव्र करण्यात आल्या आहेत. एकीकडे दबाव वाढत असतानाच दुसरीकडे सरकारच्या     पुनर्वसन धोरणामुळे नक्षलवादी मोठ्या संख्येने मुख्य प्रवाहात येत आहेत. या धोरणांतर्गत आत्मसमर्पण करणाऱ्यांना तातडीची आर्थिक मदत, घर आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Major Blow to Naxalism in Bastar: 108 Maoists Surrender

Web Summary : Security forces achieved a major success in Bastar as 108 Naxalites surrendered, influenced by Operation Prahar and rehabilitation policies. These surrenders, involving significant bounties, mark a setback for the Dandakaranya Special Zonal Committee and signal a shift towards peace.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली