दामरंचात तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:32 IST2021-03-15T04:32:57+5:302021-03-15T04:32:57+5:30
दामरंचा येथील तलावाचे मागील अनेक वर्षांपासून खोलीकरण केले नसल्याने या परिसरातील भंगारामपेठा, वेलगुर, रूमलकसा या गावातील शेतकऱ्यांना ...

दामरंचात तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन
दामरंचा येथील तलावाचे मागील अनेक वर्षांपासून खोलीकरण केले नसल्याने या परिसरातील भंगारामपेठा, वेलगुर, रूमलकसा या गावातील शेतकऱ्यांना निरुपयोगी ठरत होते. मागील दौऱ्यादरम्यान गावकऱ्यांनी ही समस्या जि. प. अध्यक्ष कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिली. कंकडालवार यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. दामरंचा येतील तलाव खोलीकरण कामासाठी जि. प. अध्यक्ष कंकडालवार यांनी संबंधित विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे निदेश संबंधित विभाागाला दिले. भूमिपूजनाप्रसंगी दामरंच्या सरपंच किरण कोडापे, उपसरपंच ज्योती सुरमवार, जलसंधारण विभागाचे उपभागीय अभियंता इंगोले, पेसा समन्वय एस. कोठारी, प्रमोद कोडापे, गोपाल सुरमवार, भास्कर कोडापे, समया चौधरी, समया लिंगम, गंगाराम गावडे, प्रकाश दुर्गे, सचिव पुराम यांच्यासह नागरिक व शेतकरी हजर होते.