शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

सहाव्या दिवशीही भिमपूरच्या शिक्षकांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2016 01:15 IST

कारण नसतानाही तसेच शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता तालुक्यातील भीमपूर

६ सप्टेंबरला दिली सुटी : नागरिकांची सभापतींकडे तक्रारकोरची : कारण नसतानाही तसेच शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता तालुक्यातील भीमपूर येथील मुख्याध्यापकांनी ६ सप्टेंबर रोजी अधिकारातील सुटी जाहीर केली. याबद्दलची पूर्व कल्पना विद्यार्थ्यांना सुद्धा दिली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतून परतावे लागले. ६ सप्टेंबर रोजी दिलेली सुटी अवैध असून या दिवसाचे वेतन कपात करण्यात यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व गावकऱ्यांनी केली आहे. १ व २ सप्टेंबर रोजी पोळ्यानिमित्त सुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मुख्याध्यापकांनी ३ सप्टेंबर रोजी स्वत:च्या अधिकारातील सुटी दिली होती. ४ सप्टेंबर रोजी रविवार आला. ५ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीची सुटी जाहीर करण्यात आली होती. म्हणजेच सलग पाच दिवसांच्या सुट्यांचा आनंद शिक्षकांनी उपभोगला होता. तरीही ६ सप्टेंबर रोजी स्वत:च्या अधिकारातील आणखी सुटी जाहीर केली. सदर सुटी आकस्मिकरित्या देण्यात आली होती. याबद्दलची कोणतीही पूर्व सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली नाही. पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर विद्यार्थी शाळेमध्ये पोहोचले. दुपारी १२ वाजेपर्यंत शिक्षकांची वाट बघितली. मात्र शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकही आले नाही. शिक्षकांची वाट बघून त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी घराकडचा रस्ता धरला. ही बाब पालकांच्या लक्षात आल्यानंतर याबाबत मुख्याध्यापकांना विचारणा केली असता, स्वत:च्या अधिकारातील सुटी दिल्याचे सांगितले. ३ सप्टेंबर रोजीच स्वत:च्या अधिकारातील सुटी दिली असतानाही आणखी ६ सप्टेंबर रोजी सुटी देण्याचे कारण काय, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात आला. याबाबतची तक्रार गावकरी, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी कोरचीचे सभापती यांच्याकडे केली. संबंधित शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. मुख्यालयी राहण्याबाबत अनेकवेळा बजावून सुद्धा यातील एकही शिक्षक मुख्यालयी राहत नाही. मुख्याध्यापक प्रभू वैद्य हे भीमपूरपासून ८० किमी अंतरावर असलेल्या ब्रह्मपुरीवरून ये-जा करतात. ते किती वाजता शाळेमध्ये येतात व जातात, याचे उत्तर त्यांनाच विचारावे, असा प्रतिप्रश्न सुद्धा शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सभापतींकडे उपस्थित केला. ६ सप्टेंबर रोजी जाहीर केलेली सुटी अवैध असून या दिवसाचे शिक्षक व मुख्याध्यापकांचे वेतन कपात करावे, अशी मागणी केली आहे.