शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी धान केंद्रावरील भाेंगळ कारभार चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:30 IST

आष्टी येथील धान केंद्रावर शेतकऱ्यांना ताटकळत ठेवून बेकायदेशीरपणे धान खरेदी केल्याचे आढळून आले. तसेच खरेदी केंद्रावर धानाचे ...

आष्टी येथील धान केंद्रावर शेतकऱ्यांना ताटकळत ठेवून बेकायदेशीरपणे धान खरेदी केल्याचे आढळून आले. तसेच खरेदी केंद्रावर धानाचे मोजमाप न करता आस्था कॉटन जिनिंग येथील धरम काट्यावर मोजमाप करून थेट गोडाऊनमध्ये टाकला जात हाेता. कापसाच्या सातबारावर धान पेरा दाखवून धान खरेदी केले जात आहे. एकरी ९.६० क्विंटल धान खरेदीची मर्यादा असताना जास्त धान खरेदी करण्याचा गोरखधंदा चालू आहे. एका दिवसात सातबारा ऑनलाइन करून पैसे देणाऱ्या व्यापाऱ्याचा माल प्रथम खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

शेतकऱ्यांना टोकन क्रमांकानुसार धान खरेदी करण्याचे सोडून शेतकऱ्यांचा माल खरेदी न करता त्यांना ताटकळत ठेवून व्यापाऱ्यांचा माल खरेदी केला जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

या केंद्रावर १६ गावांच्या धान खरेदीला मान्यता असताना ६० गावांच्या धानाची नियमबाह्यपणे खरेदी करीत असल्याचे आढळून आले आहे. २०२०-२१ च्या सातबारावर धान खरेदी करण्याचा नियम असताना बेकायदेशीरपणे २०१८-१९ च्या सातबारावर धान खरेदी केल्याची बाब समोर आली आहे. तसेच या खरेदी केंद्रावर महामंडळाचा कनिष्ठ सहायक विपणन निरीक्षक व्यंकटी बुर्ले हा एकच कर्मचारी धान खरेदीचा सर्व कारभार पाहत असल्याचेही आढळून आले आहे. विपणन निरीक्षक व्यंकटी बुर्ले महामंडळाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा गोरखधंदा करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्याला प्राधान्य न देता परस्पर व्यापाऱ्यांचे धान खरेदी केले जात असल्याचे आढळून आले.