शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

भेंडाळातील सिंचन योजना रखडली

By admin | Updated: September 7, 2016 02:21 IST

तालुक्यातील भेंडाळा येथे उपसा जलसंचिन योजना निर्मितीसाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी

शासनाचे दुर्लक्ष : १३ गावातील हजारो शेतकऱ्यांना झाला असता लाभचामोर्शी : तालुक्यातील भेंडाळा येथे उपसा जलसंचिन योजना निर्मितीसाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २००१ साली पाटबंधारे विभागाचे अव्वल सचिव यांना दिले होते. त्याचबरोबर भेंडाळा येथे राजीव जलउपसा सहकारी संस्था सुद्धा निर्माण करण्यात आली. मात्र जवळपास १४ वर्षांचा कालावधी उलटूनही या योजनेचे काम पुढे जाऊ शकले नाही.भेंडाळा येथील राजीव उपसा जलसिंचन सहकारी संस्था पंजीकृत करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आदेशानंतर आराखडा तयार करून सर्वे सुद्धा केला. या आराखड्यानुसार भेंडाळा, रामाळा, मार्र्कंडादेव, फराडा, घारगाव, दोटकुली, वाघोली, वेलतूर तुकूम, सगनापूर, एकोडी, कान्होली, फोकुर्डी, मोहुर्ली या १३ गावातील ५ हजार हेक्टर जमीन ओलीताखाली आणता येते. यासाठी मागील २० वर्षांपासून संस्थेच्या वतीने पत्रव्यवहार चालू आहेत. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहेत. योजनेच्या कामाला सुरुवात करावी, यासाठी विधीमंडळ व संसद अधिवेशन काळात गृहराज्यमंत्री खा. हंसराज अहीर, खा. अशोक नेते, माजी खा. नरेश पुगलिया यांना निवेदन देण्यात आली. मात्र लोकप्रतिनिधीसुद्धा याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे पाठपुरावा कुणाकडे करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे.राजीव जल उपसा सिंचन सहकारी संस्थेचे श्रीरंग म्हशाखेत्री, राजू चुधरी, गुरूदेव डांगे, विजय पोरेड्डीवार, किशोर डांगे, गजानन वैरागडे हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र अजूनपर्यंत या योजनेला मंजुरी प्रदान करण्यात आली नाही. विद्यमान आ. डॉ. होळी यांच्याकडेसुद्धा सदर योजनेच्या निर्मितीबाबतचे निवेदन दिले होते. मात्र अजूनपर्यंत त्यांनी सुद्धा या योजनेकडे लक्ष घातले नाही. परिणामी योजनेचे काम रखडले आहे. (शहर प्रतिनिधी)५ हजार हेक्टर क्षमताभेंडाळा येथे उपसा जलसिंचन योजना झाली असती तर याचा लाभ परिसरातील १३ गावांना झाला असता, चामोर्शी तालुक्यात रेगडी तलावाचे पाणी येते. मात्र ही गावे शेवट पडत असल्याने या गावातील बहुतांश शेतांना पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे चांगली काळीकसदार जमीन पाण्याअभावी पडिक ठेवावी लागत आहे. या योजनेमुळे सदर जमीन ओलिताखाली आली असती.