भामरागडात जास्त पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:02 IST2017-09-09T00:01:11+5:302017-09-09T00:02:00+5:30

भामरागडात जास्त पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वनव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी समाधानकारक पाऊस पडतो. गतवर्षीही पावसाची सरासरी बºयापैकी होती. मात्र यंदा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झालेला आहे. भामरागड तालुक्यात सर्वाधिक ११६२.४ मिमी पाऊस आतापर्यंत झाला आहे. विशेष म्हणजे, भामरागड तालुक्यात सरासरी अधिक पर्जन्यमान झाल्याचे प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
पावसाळ्याचे तीन महिने उलटले आहेत. मात्र यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने तलाव, बोड्या, नदी नाले व इतर जलसाठे कोरडे आहेत. त्यामुळे शेतकरीही मिळेल त्या साधनाने धान पिकाला पाणी पुरवठा करून हे पीक वाचविण्याची धडपड करीत आहेत.
पिकांवर परिणाम
जिल्ह्यात यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाले असून सातत्याने उकाडा व उष्णतामान वाढल्याचे वातावरण आहे. त्यामुळे धान, सोयाबिन, तूर, मूग, भाजीपाला व इतर पिकांवर किड व विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पावसाअभावी खत टाकलेल्या शेतातील पिकांना रोग बळावत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.