शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

बनावट ॲपद्वारे आयपीएलवर सट्टा, चार एजंट ताब्यात

By संजय तिपाले | Published: April 29, 2024 12:55 PM

अहेरीत पोलिसांची कारवाई : १० जणांवर गुन्हा दाखल

गडचिरोली : सध्या  आयपीएलचा सीजन सुरु असून बनावट ॲपद्वारे सट्टा खेळविणाऱ्या चार एजंटांना पोलिसांनी २७ एप्रिल रोजी सापळा रचून पकडले. मोठे रॅकेट उघडकीस आले असून १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखिल दुर्गे, आसिफ शेख, इरफान शेख (तिघे रा. अहेरी), संदीप गुडपवार ( रा. नागेपल्ली) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून चार मोबाईल व  रोख ९ हजार ४२० रुपये असा मुद्देमाल जप्त केला. या चौघांसह निखील गुंडावार, प्रणित श्रीरामवार, अक्षय गनमुकलवार, फरमान शेख, फरदिन पठाण, धनंजय गोगीवार हे सुध्दा एजंट म्हणून काम करत असल्याची माहिती उजेडात आली. या सर्वांवर महाराष्ट्र जुगार बंदी कायदा कलम ४ व ५ कायद्यान्वये गुन्हा नोंंद करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अहेरीचे अपर  अधीक्षक अहेरी एम. रमेश, उपअधीक्षक अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे, उपनिरीक्षक जनार्धन काळे व सहकाऱ्यांनी केली.गेस्ट हाऊसमधून चालायचे रॅकेट  अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊस येथून हे रॅकेट चालत असे. तेथे छापा मारला असता, बनावटी अॅप nice.7777.fun या प्लॅटफार्मवर ऑनलाईन आय.पी.एल क्रिकेट सट्टयाचा खेळ खेळून व इतर लोकांना त्यावर पैसे लावून खेळ खेळवित असल्याचे दिसून आले.  

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीCrime Newsगुन्हेगारीIPLआयपीएल २०२४