जिल्ह्यातील १९६ शाळांमध्ये वाजली घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:26 IST2021-07-16T04:26:08+5:302021-07-16T04:26:08+5:30
ज्या गावात काेराेनाचा प्रादुर्भाव संपलेला आहे अशा गावांमधील शाळा ग्रामपंचायत आणि शाळा समितीच्या ठरावानंतर सुरू करण्यास मंजुरी दिली जात ...

जिल्ह्यातील १९६ शाळांमध्ये वाजली घंटा
ज्या गावात काेराेनाचा प्रादुर्भाव संपलेला आहे अशा गावांमधील शाळा ग्रामपंचायत आणि शाळा समितीच्या ठरावानंतर सुरू करण्यास मंजुरी दिली जात आहे. त्यानुसार गुरुवारी प्रत्यक्ष शाळांचे वर्ग भरविण्याचा पहिला दिवस होता. यात आठवी ते बारावीचेच वर्ग प्रत्यक्ष भरविण्यास शासनाने सांगितले जाते. २८ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले; पण प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास परवानगी नसल्यामुळे शक्य असलेल्या अनेक शाळांमध्ये ऑनलाईन वर्ग सुरू होते. जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव असल्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नसल्यामुळे ऑनलाईन क्लासेस यशस्वी होऊ शकले नाही.
(बॉक्स)
रोवणीमुळे उपस्थितीवर परिणाम
शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे गुरुवारी अनेक विद्यार्थी उत्साहात शाळेत पोहोचले. मात्र, त्यांची उपस्थिती मोजकी होती. गेले दोन-तीन दिवसांत पाऊस झाल्यामुळे रोवणीच्या कामांनी वेग घेतला आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी स्वत:च्या किंवा दुसऱ्यांच्या शेतावर रोवणीसाठी गेल्याचे दिसून आले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्याची शक्यता आहे.
(कोट) सध्या आठवी ते दहावीच्या सलग तीनच तासिका घेतल्या जात आहेत. त्यात विज्ञान, इंग्रजी आणि गणित या विषयांना प्राधान्य देण्याची सूचना केली आहे. याशिवाय एका बेंचवर एकच विद्यार्थी राहणार आहे. सध्या विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे. उपस्थिती वाढल्यानंतर ५० टक्के उपस्थितीच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना दिवस वाटून दिले जातील.
- आर. पी. निकम
शिक्षणाधिकारी (माध्यमिक)