रमोरी येथील शेगाव तलावाचे सौंदर्यीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:34 IST2021-03-24T04:34:52+5:302021-03-24T04:34:52+5:30
युवक आरमोरी : येथील शेगाव तलावाची स्वच्छता करून तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसचे ...

रमोरी येथील शेगाव तलावाचे सौंदर्यीकरण करा
युवक
आरमोरी : येथील शेगाव तलावाची स्वच्छता करून तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसचे महासचिव नीलेश अंबादे व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरमोरी नगर परिषदच्या मुख्याधिकारी माधुरी सलामे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
आरमोरी येथील पालोरा रोडवरील प्रभाग क्रमांक २ येथील शेगाव तलाव अतिशय महत्त्वाचा तलाव आहे. या तलावाचा उपयोग शेतीसाठी, गुराढोरांसाठी उपयाेगी आहे. उन्हाळ्यात या तलावाच्या पाण्यामुळे सभोवताल असणाऱ्या नागरिकांच्या घरगुती विहिरी, हातपंप यांची पाणी पातळी वाढण्यास मदत हाेत आहे. परिणामी, या परिसरात पाण्याची अडचण भासत नाही.
परंतु दिवसेंदिवस तलावाची पाणी पातळी कमी हाेत आहे तसेच तलावात घाण निर्माण होत आहे. त्यामुळे तलावाची स्वच्छता व खोलीकरण करणे आवश्यक आहे. तसेच या तलावाचे सौंदर्यीकरण केल्यास लोकांना फिरण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी सोयीचे होईल. यासंदर्भात आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसचे महासचिव नीलेश अंबादे यांच्या नेतृत्वात आरमोरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधुरी सलामे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना युवक काँग्रेसचे सचिव रूपेश जाैंजाळकर, भूपेश वाकडे, निखिल दुमाने, भूषण काळबांदे, मंगेश पाटील, शुभम गिरकर, गणेश पेटकुले व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.