लाॅकडाऊनमध्ये गरजूंना शिवभाेजनाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:31 IST2021-05-03T04:31:22+5:302021-05-03T04:31:22+5:30
दीपज्योती लोकसंचालित साधन केंद्र धानोरा यांच्यावतीने संघर्ष महिला बचत गटातर्फे येथील ग्रामीण रुग्णालय समोर शिवभाेजन केंद्र सुरू करण्यात आले. ...

लाॅकडाऊनमध्ये गरजूंना शिवभाेजनाचा आधार
दीपज्योती लोकसंचालित साधन केंद्र धानोरा यांच्यावतीने संघर्ष महिला बचत गटातर्फे येथील ग्रामीण रुग्णालय समोर शिवभाेजन केंद्र सुरू करण्यात आले. लाॅकडाऊनपूर्वी या केंद्रावर दहा रुपये थाळीप्रमाणे जेवण मिळत होते, परंतु शासनाने लाॅकडाऊन जाहीर केल्यानंतर शिवभोजन मोफत मिळणार, असे घाेषित केले. हॉटेल, टपरी बंद असल्याने मजूर, भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते, रुग्णांचे नातेवाईक व इतर नागरिकांना आपली भूक भागविण्याकरिता शिवभोजन केंद्र अत्यंत उपयुक्त ठरत आहे. हे केंद्र सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळात सुरू राहत असून येथे २२ एप्रिलपासून मोफत थाळी दिली जात आहे. येथे दररोज ११० थाळ्यांचे मोफत वितरण केले जात आहे. कोरोना संसर्गामुळे शारीरिक अंतर, तसेच स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे, तसेच केंद्रावर नागरिकांची गर्दी वाढू नये, याकरिता बचत गटातील सदस्य आळीपाळीने सेवा बजावतात, याशिवाय पार्सल सुविधा उपलब्ध आहे. शिवभाेजन केंद्रामुळे गरजूंना वेळेवेळी अन्न मिळत असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.
===Photopath===
020521\02gad_7_02052021_30.jpg
===Caption===
शिवभाेजनाचा आश्वाद घेताना नागरिक.