शेतकऱ्यांना मूलभूत कर्तव्यांचे धडे
By Admin | Updated: January 24, 2015 01:01 IST2015-01-24T01:01:47+5:302015-01-24T01:01:47+5:30
जिल्हा विधिसेवा प्राधिकरण, कृषी विभाग व कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कायद्याबाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी, यासाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शेतकऱ्यांना मूलभूत कर्तव्यांचे धडे
गडचिरोली : जिल्हा विधिसेवा प्राधिकरण, कृषी विभाग व कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कायद्याबाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी, यासाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना मूलभूत कर्तव्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. व्ही. डी. गुलदेकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून तिसरे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), एस. एम. बोमीडवार, जिल्हा कृषी अधिकारी एस. पी. पठाण, कार्यक्रम समन्वयक लांबे उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी कोणत्याही बिकट प्रसंगाला खचून न जाता त्याचा सामना करायला पाहिजे. शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन बोमीडवार यांनी केले. यावेळी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी पठाण यांनी माहिती दिली. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी विविध योजनांचा लाभ देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गुलदेकर यांनी केले. संचालन नेहरकर यांनी केले. ब्राम्हणकर यांनी सहकार्य केले.