बस अपघातात बापलेक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:50 IST2018-02-28T00:50:28+5:302018-02-28T00:50:28+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या बसने धडक दिल्याने बापलेक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पलसगड वळणावर घडली.

बस अपघातात बापलेक जखमी
ऑनलाईन लोकमत
कुरखेडा : राज्य परिवहन महामंडळाच्या बसने धडक दिल्याने बापलेक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पलसगड वळणावर घडली.
लहानू जानू ठलाल (५५), प्रदीप लहानू ठलाल रा. घाटी, ता. कुरखेडा असे जखमी झालेल्या बापलेकांची नावे आहेत. दोघेही दुचाकी वाहनाने खेडेगाव येथील मंडई पाहून कुरखेडाकडे परत येत होते. दरम्यान पलसगड वळणावर विरूध्द दिशेने येणाऱ्या कुरखेडा-अंतरगाव या बसने दुचाकीला धडक दिली. धडकेमुळे बापलेक दुचाकीवरून खाली कोसळले. दोघांनाही गंभीर मार लागला आहे. त्यांना तत्काळ उपजिल्हा रूग्णालयात भरती केले आहेत.
मात्र प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती केले आहे. दोघांच्या डोक्याला मार लागला आहे.