अंकिसातील बॅंकेचे कर्मचारी संपावर, व्यवहार झाले ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:36 IST2021-03-16T04:36:41+5:302021-03-16T04:36:41+5:30
ग्रामीण बँकेत आसरअल्ली, सोमनपल्ली, गुम्मलकोंडा, सोमनूर , मोटलाटेकडा, वडदम, रंगधामपेठा, चिंतरेवला, नडीकुडा व परिसराच्या अन्य गावातील ग्राहकांची बॅंक खाती ...

अंकिसातील बॅंकेचे कर्मचारी संपावर, व्यवहार झाले ठप्प
ग्रामीण बँकेत आसरअल्ली, सोमनपल्ली, गुम्मलकोंडा, सोमनूर , मोटलाटेकडा, वडदम, रंगधामपेठा, चिंतरेवला, नडीकुडा व परिसराच्या अन्य गावातील ग्राहकांची बॅंक खाती आहेत. ग्राहक दररोज विविध ठिकाणाहून आर्थिक व्यवहार करण्याकरिता येतात. परंतु येथे पुरेशे कर्मचारी नसल्याने ग्राहकांना आल्यापावली परतावे लागते. मिरची तोडणे, कापूस काढणे व शेतातील कचरा काढणे आदी कामे सोडून नागरिकांना बॅंकेत कामानिमित्त येत आहेत. दररोज दोनशे ते तीनशे मजूर मजुरीचे काम साेडून बॅंकेत हेलपाटे मारत आहेत. त्यामुळे आर्थिक ताेटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील शाखा अधिकारी स्वप्निल तायडे यांची विचारणा केली असता, बँकेतील मुख्य कॅशिअर व लिपिक दोघे बँक खाजगीकरणाच्या विरोधात संपावर गेले आहे.जोपर्यंत दोन्ही कर्मचारी बँकेत रुजू होणार नाही, तोपर्यंत बँक बंद राहणार असे सांगितले.