अगरबत्ती प्रकल्पांना टाळे ! कोट्यवधी रुपयांचा वनविभागाचा निधी गेला पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 14:13 IST2025-02-24T14:12:50+5:302025-02-24T14:13:17+5:30

Gadchiroli : मार्केटिंग करण्यामध्ये महिला पडल्या कमी

Ban on incense sticks projects! Forest department funds worth crores of rupees have gone down the drain | अगरबत्ती प्रकल्पांना टाळे ! कोट्यवधी रुपयांचा वनविभागाचा निधी गेला पाण्यात

Ban on incense sticks projects! Forest department funds worth crores of rupees have gone down the drain

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
स्थानिक महिलांना रोजगार देण्यासाठी वनविभागाच्या सहकार्याने जिल्ह्यात जवळपास ३० अगरबत्ती प्रकल्प सुरू करण्यात आले होते. मात्र नियोजनाचा अभाव असल्याने या प्रकल्पांना आता टाळे लागले आहेत. यावर शासन व वनविभागाचा कोट्यवधींचा निधी खर्च झाला होता. तो पाण्यात गेला आहे.


गडचिरोली जिल्ह्यात उद्योग नसल्याने येथे बेरोजगारीची समस्या अतिशय गंभीर आहे. येथील बांबूचा उपयोग करून रोजगार देण्याच्या उद्देशाने वनविभागाने आठ वर्षांपूर्वी ३० अगरबत्ती प्रकल्प तयार केले होते. हे प्रकल्प तयार करण्यासाठी अनेक अडचणी आल्या. यावर मात करीत प्रकल्प सुरू करण्यात आले. यातून जवळपास शेकडो महिलांना रोजगार मिळत होता.


४०० मार्केटिंग करण्यामध्ये महिला पडल्या कमी
महिलांचा रोजगार हिरावल्या गेला आहे. आता या महिला इतर रोजगाराकडे वळल्या आहेत. अगरबत्ती प्रकल्पांना आता कुलूप ठोकण्यात आले आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.


नफा संपताच एजंटने केले हात वर
अगरबत्ती तयार करणारी मशिन खरेदी करणे, कच्चा माल पुरविणे, तयार झालेला माल खरेदी करून एका खासगी कंपनीला देणे हे सर्व काम एका खासगी एजंटच्या वतीने केली जात होते. त्यात नफा व कमिशन मिळत होते. तोपर्यंत त्या एजंटने यात लक्ष घातले. नफा संपताच हात वर केले. अगरबत्ती तयार करणाऱ्या महिलांना बाजारपेठेचा अंदाज नसल्याने प्रकल्पाला टाळे लागले.


बंद पडलेल्या मशिन दुरुस्त करणार कोण ?
अगरबत्ती तयार करण्यासाठी अनुदानातून मशिन खरेदी केल्या. त्या काही दिवसांनंतर मशिन बंद पडल्या. या मशिन दुरुस्त करणार कोण असा प्रश्न निर्माण झाला. मशिन बंद पडल्यानंतर महिलांनी काम करणे बंद केले.


नेमके काय चुकले ?
या प्रकल्पासाठी वनविभागाने दिला होता. मात्र, या प्रकल्पाची बांधणी करतेवेळी तो प्रकल्प स्थानिक वनव्यवस्थापन समितीशी जोडण्यात आला नाही. त्यामुळे या प्रकल्पावर वनविभागाचे फारसे लक्ष राहिले नाही. तोटा सुरू होताच एजन्टने हात वर केले व प्रकल्प बंद पडले.

Web Title: Ban on incense sticks projects! Forest department funds worth crores of rupees have gone down the drain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.