इमारतीस वन कायदा अडसर
By Admin | Updated: May 12, 2014 23:39 IST2014-05-12T23:39:50+5:302014-05-12T23:39:50+5:30
जिल्ह्यातील घोट येथील एकमेव असलेल्या नवोदय विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम जागेअभावी जागेअभावी दोन वर्षापासून रखडले आहे. वनजमिनीसाठी विद्यापीठ प्रशासनाने दोन वर्षापूर्वी वन विभागाकडे दीड

इमारतीस वन कायदा अडसर
घोट : जिल्ह्यातील घोट येथील एकमेव असलेल्या नवोदय विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम जागेअभावी जागेअभावी दोन वर्षापासून रखडले आहे. वनजमिनीसाठी विद्यापीठ प्रशासनाने दोन वर्षापूर्वी वन विभागाकडे दीड कोटी रूपयाचा भरणा केला आहे. मात्र मध्य प्रदेशातील भोपाळ येथील केंद्रीय वन विभागाच्या कार्यालयाकडून मंजुरीच न मिळाल्याने सध्या तरी इमारतीचा प्रश्न कायम आहे. जिल्ह्यात १९८८ मध्ये चामोर्शी तालुक्यातील घोट येथे नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. सध्यास्थितीत या विद्यालयात इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे एकूण ४७५ विद्यार्थी व विद्यार्थीनी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. नवोदय विद्यालयाची स्थापना करतांना वन जमिनीवर इमारतीचे बांधकाम करण्यात आले. मात्र यानंतर विद्यार्थी संख्येत वाढ झाल्याने जुनी इमारत अपुरी पडत आहे. या इमारतीच्या परिसरातच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांसाठी निवासस्थानाचे बांधकाम करण्यात आले. मात्र यांचीही संख्या वाढल्याने निवासस्थानाअभावी त्यांना गावात भाड्याच्या खोलीत राहावे लागत आहे. सध्या घोट येथील नवोदय विद्यालयात ४१ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र या कर्मचार्यांसाठी पुन्हा ३३ निवासस्थानाची गरज आहे. अनेक निवासस्थाने जीर्ण झाली आहेत. इमारत बांधकामासाठी १९९१ पासून नवोदय विद्यालयाच्या प्रशासनाच्यावतीने पाठपुरावा करण्यात येत आहे. जमिनीसाठी ३१ मे २0११ रोजी नवोदय प्रशासनाने वन विभागाकडे १ कोटी ३३ लाख ७९ हजार ६६४ रूपये भरले आहेत. पाठपुराव्यासाठी १९९१ पासून ते आतापर्यंत १0 लाख रूपयाचा खर्च विविध कामात झाला असल्याची माहिती आहे. मात्र विद्यालयाच्या इमारतीसाठी अद्यापही वनविभागाने वनजमिन उपलब्ध करून दिली नाही. यामुळे इमारतीचा प्रश्न कायमच आहे. (वार्ताहर)