भामरागडात महिलांनी फोडल्या दारूच्या बाटल्या

By Admin | Updated: March 10, 2016 01:45 IST2016-03-10T01:45:07+5:302016-03-10T01:45:07+5:30

भामरागड गावात अवैध दारूविक्री वाढली असल्याने महिलांना त्रासही वाढला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी बुधवारी पोलीस अधिकाऱ्यांचे सहकार्य घेऊन

Bamragadam women screwed bottles | भामरागडात महिलांनी फोडल्या दारूच्या बाटल्या

भामरागडात महिलांनी फोडल्या दारूच्या बाटल्या

पोलिसांकडे सुपूर्द केला विक्रेता : नारी शक्तीचा एल्गार
भामरागड : भामरागड गावात अवैध दारूविक्री वाढली असल्याने महिलांना त्रासही वाढला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी बुधवारी पोलीस अधिकाऱ्यांचे सहकार्य घेऊन दारूविक्रेत्याविरोधात धडक एल्गार पुकारला. दारूविक्रेत्याकडून देशी, विदेशी दारूच्या निपा जप्त करून त्या महिलांनी फोडून टाकल्या.
या महिलांच्या आंदोलनात सपना रामटेके, पुष्पा कुळमेथे, साधना मडावी, सुशीला गुम्मा, प्रीती मडावी, निर्मला सडमेक, यशोदा उईके, किरण मेश्राम, भारती इष्टाम, सुक्री तलांडे, सुमित्रा मडावी, सपना रामटेके, वनीता कुळयामी, सुभद्रा आत्राम, पेंटीबाई पोटावी, अर्चना सडमेक, लक्ष्मी मडावी, लक्ष्मी पिळसे, कल्पना तलांडे, शांता मडावी, चिंती मडावी, वसंती आत्राम, तारा मडावी, माली कलमोटी, सुचित्रा वेलादी आदी सहभागी झाल्या होत्या. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Bamragadam women screwed bottles