वृक्ष संवर्धनासाठी बांबू ट्री गार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:40 IST2017-12-30T00:39:47+5:302017-12-30T00:40:04+5:30
मुख्यमंत्र्यांच्या एक हजार खेडी मिशनच्या अंमलबजावणीसाठी व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन (व्हीएसटीएफ) ची स्थापन करण्यात आली आहे. यासाठी ग्राम सामाजिक परिवर्तकांची नेमणूक करण्यात आली आहे.

वृक्ष संवर्धनासाठी बांबू ट्री गार्ड
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : : मुख्यमंत्र्यांच्या एक हजार खेडी मिशनच्या अंमलबजावणीसाठी व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन (व्हीएसटीएफ) ची स्थापन करण्यात आली आहे. यासाठी ग्राम सामाजिक परिवर्तकांची नेमणूक करण्यात आली आहे. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आणि जे एस.डब्ल्यू. यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक यांच्या मार्फत बांबू ट्री गार्ड बनविण्यात आले. व हे ट्री गार्ड ग्रामस्थांना पुरविले आले.
याप्रसंगी जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम परिवर्तकांच्या सहाय्याने ग्राम परिवर्तनासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा आणि मूलचेरा हे दोन तालुके ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट केली आहेत. या दोन तालुक्यातील १३ ग्रामपंचायती निवडलेल्या आहेत. या ग्रामपंचायत परिसरामध्ये वृक्ष लागवड केली गेली आहे. अशा रोपट्यांना संरक्षण म्हणून बांबू ट्री गार्ड तयार करण्यात आले आहेत. प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम या ग्रामपंचायतींमध्ये राबविला जात आहे. प्रत्येक गावाला २५ बांबू ट्री गार्ड बनवली गेली आहेत. गावकऱ्यांचा प्रतिसाद पाहून गावकºयांना बांबू ट्री गार्ड बनविण्याचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण वडसा बांबू केंद्र येथे दिले जाणार आहे. जिल्ह्यात असलेल्या मुबलक बांबू या गौन वनऊपजाचा उपयोग करून रोजगार उपलब्ध होणार आहे. ट्री गार्डमुळे कुरखेडा व मुलचेरा तालुक्यातील वृक्ष संरक्षणाला बळ मिळणार आहे.