बचत गटांमुळे सावकारीला चाप
By Admin | Updated: December 21, 2014 22:59 IST2014-12-21T22:59:48+5:302014-12-21T22:59:48+5:30
ग्रामीण भागात महिलांचे बचत गट हे लाभदायी ठरत आहे़त या माध्यमातून आर्थिक देवाण-घेवाणीचा व्याप वाढला आहे. कुटुंबातील आर्थिक कामे सहज होत आहेत़ शिवाय बचत गटांचा सर्वाधिक

बचत गटांमुळे सावकारीला चाप
देसाईगंज : ग्रामीण भागात महिलांचे बचत गट हे लाभदायी ठरत आहे़त या माध्यमातून आर्थिक देवाण-घेवाणीचा व्याप वाढला आहे. कुटुंबातील आर्थिक कामे सहज होत आहेत़ शिवाय बचत गटांचा सर्वाधिक लाभ सध्या शेतकऱ्यांना होताना दिसत आहे़ बँकेचे कर्ज न मिळाल्यास शेतकऱ्यांना सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत होते़ मात्र आता बचत गटामुळे अवैध सावकार किंवा बॅकेतूनही शेतकरी कर्ज न घेता सरळ बचत गटातून रक्कम घेत आहेत
महिला बचत गटाची आर्थिक उलाढाल ग्रामीण भागात वाढीस लागली आहे़ यामुळे सावकारांकडून पैसे घेणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. यामुळे एकप्रकारे महिला बचत गटामुळे पुरुषांच्या सावकारीला आळाच बसल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे़ शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही आर्थिक व्यवहाराचे चित्र बदलत आहे़ पुरुषाच्या बचत गटाबरोबरच महिलांनीही बचत गटाची स्थापना केली़ या माध्यमातून त्यांच्या कुटुंबांना हातभार लागत असल्याचे चित्र दिसत आहे़ जिल्हाभरात अनेक ठिकाणी महिला बचत गटाच्या महिलांनी लहान-मोठे व्यवसाय सुरू केले आहेत़ सध्या ते चांगल्या प्रकारे सुरू आहेत. ग्रामीण भागात महिलांच्या बचत गटाचा शेतकऱ्यांनाही चांगलाच फायदा होत आहे़ मागील पाच वर्षात महिला बचत गटाचे प्रमाण वाढले आहे. या बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या कुटुंबांनाही आर्थिक हातभार लागत आहे़ बचत गटातून आर्थिक मदत होत असल्याने अवैध सावकारीला आळा बसण्यास मदत होत असल्याचे दिसते़ (वार्ताहर)