सरकारच्या विरोधात आयटकची निदर्शने

By Admin | Updated: September 3, 2016 01:27 IST2016-09-03T01:27:42+5:302016-09-03T01:27:42+5:30

कामगार वर्गाच्या विविध मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात स्थानिक इंदिरा गांधी चौकात शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास निदर्शने करण्यात आली.

Ayat's protest against the government | सरकारच्या विरोधात आयटकची निदर्शने

सरकारच्या विरोधात आयटकची निदर्शने

विविध मागण्यांचा समावेश : शेकडो कर्मचाऱ्यांची उपस्थिती; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
गडचिरोली : कामगार वर्गाच्या विविध मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात स्थानिक इंदिरा गांधी चौकात शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये सरकारी व निमसरकारी विभागाचे कामगार, कर्मचारी, आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या संघटनांनी सहभाग घेतला होता.
रोजगार निर्मितीसाठी ठोस पावले उचलून बेरोजगार कमी करण्यात यावी, सर्व कामगारांना सार्वभौम सामाजिक सुरक्षा प्रदान करावी, असंघटीत क्षेत्रातील कामगार, अंगणवाडी सेविका, आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी, हातपंप देखभाल व दुरूस्ती कर्मचारी यांना किमान १८ हजार रूपये मासिक वेतन देण्यात यावे, ग्रॅज्युएटीची मात्र वाढविण्यात यावी, रेल्वे, सुरक्षा व अन्य महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये विदेशी गुंवणूक केली जाऊ नये आदी मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, जिल्हा सचिव विनोद झोडगे, कामगार नेते महेश कोपुलवार, खेत मजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष अमोल मारकवार, प्रकाश खोब्रागडे, जगदिश मेश्राम, आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियनच्या जिल्हा सचिव रजनी गेडाम, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव कुंदा चलिलवार, राधा ठाकरे, जलिलखॉ पठाण आदींनी केले. (शहर प्रतिनिधी)

गडचिरोली व मुलचेरातील परिचारिका संपावर
पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, सातवा वेतन आयोग १ जानेवारी पासून लागू करावा, केंद्राप्रमाणेच वाहतूक भत्ता, शैक्षणिक भत्ता, होस्टेल भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना लागू करावा, महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची बाल संगोपण रजा मंजूर करावी, चतुर्थ व तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची पदोन्नती नियमानुसार करावी आदी मागण्यांसाठी गडचिरोली व मुलचेरा रूग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप केला. काही वेळ रूग्णालयासमोर निदर्शने केली. आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष विस्तारी फेबुलवार, सचिव स्नेहल संतोषवार, विना शर्मा, सपना आर्इंचवार यांनी केले. मुलचेरा येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी जी. बी. गेडाम, एस. पी. मडावी, के. टी. सोनुले, एस. ए. सडमेक, एन. व्ही. रॉय, एस. पी. चौधरी, एल. एम. नगराळे, ए. पी. चिरकुलवार, एल. के. बिरहा, आर. डी. चावरे, डी. ए. तुशावार, एस. एल. रामटेके, पी. जनगम, एस. एस. मालाकार, एस. गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Ayat's protest against the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.