भीषण; अंगावर रॉकेल टाकून महिलेला जिवंत पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 09:31 PM2021-09-27T21:31:30+5:302021-09-27T21:32:00+5:30

Gadchiroli News सासू, नणंदेने अंगावर रॉकेल टाकून एका विवाहित महिलेला जिवंत पेटवून दिल्याची घटना पोर्ला येथे घडली. यात पतीनेही सहकार्य केल्याने तिघांविरुद्ध गडचिरोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

Awful; He threw kerosene on her body and set her on fire | भीषण; अंगावर रॉकेल टाकून महिलेला जिवंत पेटविले

भीषण; अंगावर रॉकेल टाकून महिलेला जिवंत पेटविले

Next
ठळक मुद्देपोर्ला येथील घटना, पतीसह सासू-नणंदेला अटक

 

गडचिरोली : सासू, नणंदेने अंगावर रॉकेल टाकून एका विवाहित महिलेला जिवंत पेटवून दिल्याची घटना पोर्ला येथे घडली. यात पतीनेही सहकार्य केल्याने तिघांविरुद्ध गडचिरोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. चंद्रकला मुकेश बांबोळे (वय ३३) असे जखमी महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. पोलीस सूत्रानुसार, मूळच्या गडचिरोली जिल्ह्यातील असलेल्या चंद्रकला हिचा विवाह जळगाव जिल्ह्यातील नसिराबाद येथील अरुण पाटील यांच्याशी २०११ मध्ये झाला होता, पण त्यांच्यात पटत नसल्यामुळे घटस्फोट होऊन चंद्रकला माहेरी राहायला आली. तिला पहिल्या पतीपासून १० वर्षाची मुलगीही आहे.

दरम्यान, अगरबत्ती प्रकल्पात काम करताना मुकेश बांबोळे याच्याशी तिचे सूत जुळले. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. चंद्रकलाच्या मुलीलाही मुकेशने स्वीकारले, पण त्याच्या आई व बहिणीला ते मान्य नव्हते. त्यावरून त्यांचे खटके उडत होते. अलीकडे मुकेशचेही तिच्याशी पटत नसल्यामुळे तिचा भ्रमनिरास झाला. यातूनच चंद्रकलाची सासू सरस्वती धर्माजी बांबोळे आणि नणंद ममता धर्माजी बांबोळे यांनी तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवले. पती मुकेश धर्माजी बांबोळे याने नंतर तिला दवाखान्यात आणले.

याप्रकरणी चंद्रकलाच्या जबाबावरून तिघांवरही भादंवि कलम ३०७, ४९८ (अ), ३४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. अधिक तपास एपीआय गोरे करीत आहे.

आंतरजातीय प्रेमविवाहाची शोकांतिका

मुकेशने दाखविलेल्या प्रेमाला चंद्रकला भाळली आणि तो जीवनभर साथ देईल या विश्वासाने गेल्यावर्षी त्यांनी लग्न केले, पण या लग्नाला दोघांच्याही घरातून विरोध होता. अखेर सासू-नणंदेचा द्वेष विकोपाला जाऊन त्यांनी तिला पेटवले. त्यात ती ६९ टक्के भाजली गेली. तिला आधी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूरला हलविले. तिची १० वर्षाची मुलगी आता चंद्रकलाच्या भावाच्या घरी आहे.

Web Title: Awful; He threw kerosene on her body and set her on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app