मेळाव्यात योजनांची जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST2020-03-10T05:00:00+5:302020-03-10T05:00:55+5:30

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनंदा कोडापे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आवलमरीच्या अंगणवाडी सेविका ललीता पागडे, व्यंकटापूर शासकीय आश्रमशाळेच्या अधीक्षिका गीता वाघमारे, बचत गटाच्या अध्यक्ष शशिकला श्रीकोंडावार, शिक्षिका नीता कोंडावार, आवलमरीचे पोलीस पाटील मनोहर पागडे, व्यंकटापूरचे पोलीस पाटील बाबुराव झाडे उपस्थित होते.

Awareness of schemes at the fair | मेळाव्यात योजनांची जागृती

मेळाव्यात योजनांची जागृती

ठळक मुद्देव्यंकटापूर येथे कार्यक्रम : रोजगारासह कायदेविषयक मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
व्यंकटापूर : येथे उपपोलीस स्टेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त बेबी मडावी महिला विकास मेळावा रविवारी घेण्यात आला. या मेळाव्यात विविध योजनांची जागृती करण्यात आली.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनंदा कोडापे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आवलमरीच्या अंगणवाडी सेविका ललीता पागडे, व्यंकटापूर शासकीय आश्रमशाळेच्या अधीक्षिका गीता वाघमारे, बचत गटाच्या अध्यक्ष शशिकला श्रीकोंडावार, शिक्षिका नीता कोंडावार, आवलमरीचे पोलीस पाटील मनोहर पागडे, व्यंकटापूरचे पोलीस पाटील बाबुराव झाडे उपस्थित होते.
प्रभारी अधिकारी एस. एस. शेटे यांनी मेळाव्याचे उद्दिष्ट सांगून गावातील मुलींनी शिक्षणात व खेळात प्रावीण्य मिळवून स्वत:चा व गावाचा विकास करावा, असे आवाहन केले. तसेच विधवा पेंशन योजना, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अंगणवाडी पोषण योजना, मातृत्त्व वंदना योजनेसह अनेक शासकीय विभागांमार्फत महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देऊन महिलांना कायदे व अधिकार व रोजगाराबाबत मार्गदर्शन केले. पोलीस उपनिरीक्षक एम. एम. कुंभार यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.
मेळाव्यादरम्यान शासकीय सेवेत दाखल झालेल्या पोलीस शिपाई वनिता कोडापे तसेच आरोग्य सेविका सुशीला मडावी यांचा सत्कार करण्यात आला. सुनंदा कोडापे यांनी गावातील महिलांनी आपल्या मुलांना नियमित शाळेत पाठवावे, त्यांच्यावर योग्य संस्कार करावे, तेव्हाच दुर्गम गावात विद्यार्थ्यांचा विकास होईल, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन पोलीस शिपाई सुनील घुगे यांनी तर आभार पोलीस शिपाई रघुपती आलाम यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील २०० ते २५० महिला व ७० ते ८० पुरूष उपस्थित अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

नि:शुल्क आरोग्य तपासणी
उपपोलीस स्टेशनच्या वतीने मेळाव्यास्थळी आरोग्य विभागामार्फत महिलांची आरोग्य तपासणी करून औषधोपचारांचे वितरण करण्यात आले. यावेळी गीतगायन, रांगोळी स्पर्धासुद्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये बहुसंख्य महिलांनी भाग घेऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.

Web Title: Awareness of schemes at the fair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.