समाजात धम्माची जागृती करा

By Admin | Updated: January 23, 2017 00:57 IST2017-01-23T00:57:52+5:302017-01-23T00:57:52+5:30

बुद्धाचा धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग आहे. या मार्गाने जीवन जगल्यास माणसाच्या जीवनातील दु:ख नाहीसे होते.

Awareness of Dhamma in the society | समाजात धम्माची जागृती करा

समाजात धम्माची जागृती करा

कोकडीत धम्मपरिषद : भंते कृपाशरण व ई. झेड. खोब्रागडे यांचे बांधवांना आवाहन
देसाईगंज : बुद्धाचा धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग आहे. या मार्गाने जीवन जगल्यास माणसाच्या जीवनातील दु:ख नाहीसे होते. यासाठीच हजारो वर्षांपासून गावकुसाबाहेर पशुतुल्य जीवन जगणाऱ्या माणसांना मानवी मूल्यांचा प्रकाश देऊन सन्मानाने जीवन जगायला लावणारा बुद्धाचा धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. धम्म जागृतीने बाबासाहेबांचे विचार जनमाणसांत रूजवा, असे प्रतिपादन चंद्रपूर येथील भिक्खू संघाचे संघटक भदंत कृपाशरण व सामाजिक विचारवंत ई. झेड. खोब्रागडे यांनी केले.
कोकडी येथे त्रिरत्न समता संघ देसाईगंज व बौद्ध समाज कोकडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धम्म परिषदेत मार्गदर्शन करताना भदंत कृपाशरण व ई. झेड. खोब्रागडे बोलत होते.
परिषदेदरम्यान तथागत बुद्धांच्या प्रतिमेचे अनावरण ई. झेड. खोब्रागडे यांच्या उपस्थितीत भदंत कृपाशरण यांच्या हस्ते झाले. समता सैनिक दलाच्या वतीने पंचरंगी व निळ्या ध्वजाला वसंत माटे व डेविड शेंडे यांच्या नेतृत्त्वात सलामी देण्यात आली.
धम्म परिषदेला आरमोरीचे धर्माजी बांबोळे, लाखांदूरचे दिगांबर मेश्राम, नागपूरचे मिलींद बन्सोड, माजी शिक्षणाधिकारी मेश्राम, विजय बेले, सरपंच मन्साराम बुद्धे, माजी पं. स. सभापती परसराम टिकले, डॉ. पीतांबर कोडापे उपस्थित होते.
धम्म परिषदेचे प्रास्ताविक मुख्य प्रवर्तक विजय बन्सोड यांनी केले. त्यांनी धम्म परिषदेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. संचालन रामेश्वर चिमणकर तर आभार सचिव एम. ए. रामटेके यांनी मानले. यशस्वीतेसाठी अध्यक्ष चंदूराव राऊत, गिरीधर मेश्राम, गौतम लांडगे, सुखदेव खोब्रागडे, घनश्याम बन्सोड, कृपादास मेश्राम, चंद्रशेखर लांडगे यांनी सहकार्य केले. यावेळी बौद्ध समाज कोकडी, त्रिरत्न समता संघाचे पदाधिकारी व कोकडी येथील बहुसंख्य बौद्ध समाजबांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

ज्येष्ठ नागरिक व गुणवंतांचा सत्कार
धम्म परिषदेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राघोबा शेंडे, अण्णाजी बोरकर, उद्धवराव खोब्रागडे, दादाजी चहांदे, सीताराम राऊत व चोखोबा शेंडे यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी प्रशील राऊत, भागवत टिकले, किरण गभणे, अहेबाजखान पठाण, साजिया शेख, श्वेतांगी जांभुरे, ममता मानकर यांचा तसेच उच्चविद्याविभूषित डॉ. नरेश बन्सोड, डॉ. फिरोज मेश्राम, डॉ. नूपूर बोदेले, डॉ. अश्विनी मेश्राम व आचल घुटके यांचा पालकांसह त्रिरत्न समता संघाच्या वतीने प्रमाणपत्र व पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला.

Web Title: Awareness of Dhamma in the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.