झाडीबाेली साहित्य मंडळातर्फे पुरस्कार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST2021-07-23T04:22:33+5:302021-07-23T04:22:33+5:30
परिश्रम भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ॲड. लखनसिंह कटरे होते. प्रमुख भाष्यकार म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, गझलकार ...

झाडीबाेली साहित्य मंडळातर्फे पुरस्कार वितरण
परिश्रम भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ॲड. लखनसिंह कटरे होते. प्रमुख भाष्यकार म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, गझलकार मिलिंद उमरे, तसेच सत्यसाई सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष मनीष समर्थ, कवी डाॅ. चंद्रकांत लेनगुरे, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हा सचिव कमलेश झाडे यांनी केले. आपली झाडीपट्टीसुद्धा साहित्य आणि कला क्षेत्रात पुढे आहे. मानवी जीवनात साहित्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून साहित्य लेखकांनी सकस साहित्य लेखन केले पाहिजे. गोंडवाना विद्यापीठात लवकरच झाडीबोली भाषाअध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, असे डाॅ. चिताडे म्हणाले. संचालन कवी प्रमोद बोरसरे यांनी केले, तर आभार विलास निंबोरकर यांनी मानले.
दुसऱ्या सत्रात निमंत्रित कवींचे कविसंमेलन अरुण झगडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. विनायक धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यात रामकृष्ण चनकापुरे, संतोषकुमार उईके, सुनील पोटे, प्रशांत भंडारे, लक्ष्मण खोब्रागडे, नंदकिशोर मसराम, संगीता ठलाल, प्रेमिला अलोणे, संजीव बोरकर, प्रमोद राऊत, उपेंद्र रोहनकर, पुरुषोत्तम ठाकरे, वामन गेडाम, वीरेनकुमार खोब्रागडे यांनी सहभाग घेतला.
संचालन मारोती आरेवार यांनी केले, तर आभार मालती सेमले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुनीता निंबोरकर, संजीव बोरकर, प्रमोद बोरसरे, जितेंद्र रायपुरे यांनी सहकार्य केले.
बाॅक्स
यांचा झाला गाैरव
कार्यक्रमात गडचिरोली झाडीबोली साहित्य मंडळातर्फे देण्यात येणारे वार्षिक पुरस्कार मारोती आरेवार (उत्कृष्ट काव्यलेखन), देविदास शेंडे (लोक कलावंत), डाॅ. चंद्रकांत लेनगुरे (झाडीबोली काव्यलेखन) यांना प्रदान करण्यात आले, तसेच लखनसिंह कटरे यांच्या आगामी काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठाचे विमोचन करण्यात आले.