Awaiting erection | खडीकरणाची प्रतीक्षाच
खडीकरणाची प्रतीक्षाच

ठळक मुद्देसुभाषनगरातील नागरिक त्रस्त : मुरखळा ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुरखळा (नवेगाव) ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या सुभाषनगरातील रस्त्याचे खडीकरण न झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर चिखल पसरला असल्याने येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना चिखल तुडवावे लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे खडीकरण करून डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मुरखळा येथील सुभाषनगरातील महात्मा गांधी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या वसाहतीतून जाणाऱ्या रस्त्यावर खडीकरण झाले नाही. सदर रस्ता कच्च्या स्वरूपात आहे. येथून विद्यार्थी शाळेत ये-जा करीत असतात. अतिवृष्टीमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पसरला आहे. चिखल व खड्ड्यांमुळे लहान मुलांना शाळेत आवागमन करताना त्रास होतो. परंतु या समस्येकडे ग्राम पंचायत सरपंच, सचिव व सदस्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी सुभाषनगर वॉर्डातील नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, मागील अनेक दिवसांपासून मागणी केली जात असल्याने अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

नाली बांधकामाची मागणी
मुरखळा येथील सुभाषनगर भागात नालीचे बांधकाम न झाल्याने पाणी डबक्यांमध्ये साचून राहत आहे. या भागात पक्क्या नाल्यांचे बांधकाम करावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. परंतु या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.


Web Title: Awaiting erection
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.