...अन् लाेकांना नकाेसा झालेला ‘ताे’ मनाेरूग्ण पाेहाेचला रूग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 05:00 IST2022-02-03T05:00:00+5:302022-02-03T05:00:42+5:30

मालेवाडा पाेलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या कातलवाडा येथील ही संवेदनशील घटना आहे. साेमनाथ टुमसूजी चांग (४०, रा. कातलवाडा) असे त्या मनाेरुग्णाचे नाव आहे. त्यांना पत्नी व दाेन मुली आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांना मानसिक आजाराने ग्रासले. या आजारात ते गावात काेणाशीही हुज्जत घालायचे, मारपीट करायचे. त्यांच्या अशा वागण्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले हाेते.

At the hospital, the mentally ill ‘Tae’ was seen by Anlake | ...अन् लाेकांना नकाेसा झालेला ‘ताे’ मनाेरूग्ण पाेहाेचला रूग्णालयात

...अन् लाेकांना नकाेसा झालेला ‘ताे’ मनाेरूग्ण पाेहाेचला रूग्णालयात

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : मनाेरुग्ण असल्यामुळे गावात काेणावरही हल्ला करेल याची दहशत हाेती. काेणीही त्या मनाेरुग्णाशी हुज्जत घालत नव्हते. त्याच्यापासून धाेका हाेऊ नये म्हणून घरच्यांनीच त्याच्या पायात बेड्या घातल्या. एके दिवशी हे दृश्य पाेलीस अधिकाऱ्याने पाहिले. अन् त्यांचे हृदय पाझरले. पाेलिसांनी स्वत: पुढाकार घेऊन त्या मनोरुग्णाला विशिष्ट प्रक्रियेद्वारे थेट नागपुरातील मानसिक रुग्णालयात दाखल केले. 
मालेवाडा पाेलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या कातलवाडा येथील ही संवेदनशील घटना आहे. साेमनाथ टुमसूजी चांग (४०, रा. कातलवाडा) असे त्या मनाेरुग्णाचे नाव आहे. त्यांना पत्नी व दाेन मुली आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांना मानसिक आजाराने ग्रासले. या आजारात ते गावात काेणाशीही हुज्जत घालायचे, मारपीट करायचे. त्यांच्या अशा वागण्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. बाहेरबाधा आहे, अशी अंधश्रद्धा बाळगून घरच्यांनी त्याच्या पायात बेड्या घातल्या. मांत्रिकाकडे नेले, काेंबडे, बकरे दिले. परंतु काहीच फायदा झाला नाही. 
एकेदिवशी मालेवाडा पाेलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी राठाेड हे गस्तीवर असताना त्यांना सदर मनाेरुग्ण दिसला. 
राठाेड यांनी सर्वप्रथम त्याला मालेवाडा प्राथमिक आराेग्य केंद्रात व त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. त्यानंतर कुरखेडा येथील काेर्टात २९ जानेवारीला कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मनाेरूग्णाचे परवानगीबाबतचे कागदपत्र तयार करून नागपूर येथील मानसिक आजाराच्या रुग्णालयात दाखल केले. आता साेमनाथ चांग यांच्यावर तिथे उपचार सुरू आहे. पाेलीस अधिकाऱ्याच्या संवेदनशीलतेमुळेच एका मानसिक रुग्णाला चांगले उपचार मिळत आहेत.

 

Web Title: At the hospital, the mentally ill ‘Tae’ was seen by Anlake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस