Ashti police patrol day and night | आष्टी पोलिसांची दिवसरात्र गस्त

आष्टी पोलिसांची दिवसरात्र गस्त

ठळक मुद्देजिल्ह्याची सीमा बंद : अत्यावश्यक सेवेतील व परवानगी असलेल्या वाहनांनाच मुभा

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : कोरोनाच्या आजाराने थैमान घातल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली. नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना दिल्यानंतरही काही नागरिक घराबाहेर पडत आहेत. विनाकारण व रिकामटेकड्या बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर अंकूश ठेवण्यासाठी आष्टी पोलिसांनी जिल्हाबंदी करून आष्टी येथे चेक पोस्ट उभारला. या चेकपोस्टच्या माध्यमातून ये-जा करणारे वाहन व नागरिकांवर पोलिसांची २४ तास नजर आहे.
येथील आंबेडकर चौकात १ पथक तसेच दुसरे फिरते पथक, घाटकुळ येथे चंद्रपूर जिल्हा सीमेवर पोलीस कर्मचारी २४ तास थांबून काम करीत आहेत. परंतु नागरिक गरज नसतानासुद्धा घराबाहेर पडून फिरत असल्याचे दिसत आहेत. कोरोनामुळे जगातील लाखो नागरिक ग्रस्त आहेत. अशावेळी पोलीस, डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सुरक्षा व्यवस्था सांभाळत आहेत. त्यांच्या या कार्यात नागरिकांनीही त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आष्टी येथे वैनगंगा नदीपासून चंद्रपूर जिल्ह्याची सीमा प्रारंभ होते. जिल्हा बंदीमुळे नागरिकांना दुसºया जिल्ह्यात जाता येत नाही. जिल्हा सीमेवर पोलीस २४ तास कार्यरत आहेत. येणाºया प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जात असून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत सुरू आहे. विनाकारण दुचाकीवर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन करणाºया दोन इसमांवर आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनाकारण फिरणाºया दुचाकीस्वारांना पोलीस चोपही देत आहेत. या सर्व सुरक्षा व्यवस्थेवर पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांची नजर आहे.

Web Title: Ashti police patrol day and night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.