आरमोरीच्या आमदाराचे नाव वगळले

By Admin | Updated: September 27, 2015 01:01 IST2015-09-27T01:01:15+5:302015-09-27T01:01:15+5:30

२ आॅक्टोबर रोजी गोंडवाना विद्यापीठाचा चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.

Armori's father's name was omitted | आरमोरीच्या आमदाराचे नाव वगळले

आरमोरीच्या आमदाराचे नाव वगळले

२ आॅक्टोबरला आयोजन : विद्यापीठाच्या वर्धापन दिन कार्यक्रम पत्रिकेतून
गडचिरोली : २ आॅक्टोबर रोजी गोंडवाना विद्यापीठाचा चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांचे नाव विद्यापीठाच्या प्रशासनाने वगळल्यामुळे राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या प्रशासनाने हा प्रकार हेतुपुरस्सर केला की काय याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
२ आॅक्टोबरला गोंडवाना विद्यापीठाच्या चौथ्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या नावाचा उल्लेखही निमंत्रण पत्रिकेवर करण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यातील असूनही आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांना निमंत्रितांमधूनही वगळण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदर्श समाज भूषण पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक, आदर्श अधिकारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीला विद्यापीठाने कार्यक्रमातून वगळल्यामुळे राजकीय वर्तुळात याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
यासंदर्भात कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांना विचारणा केली असता विद्यापीठ मुख्यालय असलेल्या क्षेत्रातील आमदार व खासदारांचे नाव पत्रिकेत टाकण्यात आले आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या आमदारांचे नाव टाकले असते तर चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच आमदार व खासदारांचे नाव घालावे लागले असते. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने ‘शॉट बट स्वीट’ असा हा तोडगा काढला आहे. आमदार क्रिष्णा गजबे यांना निमंत्रण दिले जाणार आहे. ते आले तर विद्यापीठ प्रशासन योग्य तो सन्मान करेल, असेही डॉ. इरपाते यांनी स्पष्ट केले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Armori's father's name was omitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.