देलनवाडी आरोग्य केंद्रात स्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:39 IST2021-04-28T04:39:56+5:302021-04-28T04:39:56+5:30
देलनवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील मानापूर, देलनवाडी, मांगदा, कुलकुली, कोसरी यासह अनेक गावातील रुग्णांना सेवा मिळत असते. ...

देलनवाडी आरोग्य केंद्रात स्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करा
देलनवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील मानापूर, देलनवाडी, मांगदा, कुलकुली, कोसरी यासह अनेक गावातील रुग्णांना सेवा मिळत असते. परंतु गेल्या काही महिन्यापासून येथील वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त असून, अद्यापही या आरोग्य केंद्राला नवीन वैद्यकीय अधिकारी मिळाला नाही. त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी त्यांचा तात्पुरता पदभार वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वागधरे यांच्याकडे आहे. परंतु त्यांनाच आपले वैरागड प्राथमिक आरोग्य केंद्र सांभाळण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे ते देलनवाडी केंद्राकडे फारसे वेळ देऊ शकत नाही.
सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची दोन पदे स्थायी स्वरूपात मंजूर आहेत. मात्र येथील एका वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद गेल्या अनेक महिन्यापासून रिक्त असून, ते भरण्यात आले नाही. त्यामुळे सध्या कंत्राटी मानसेवी डाॅक्टराच्या भरवशावर आरोग्य केंद्राचा डोलारा सुरू असल्यामुळे रुग्णांना चांगली सेवा मिळण्यास अडचण जात आहे. त्यामुळे पर्यायाने आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत धावपळ करावी लागते. आता तर गावोगावी काेरोनाच्या भीतीचे वातावरण आहे.