आणखी ११० जणांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST2020-09-11T05:00:00+5:302020-09-11T05:00:45+5:30
नवीन कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली येथील वेगवेगळया ठिकाणी कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कातील तीव्र जोखमीचे ३९ जण कोरोनाबाधित आढळून आले. याशिवाय चामोर्शी येथील २३, अहेरीतील ३, आरमोरीतील २ जणांचा समावेश आहे. तसेच धानोरातील १४, कुरखेडा येथील ७, सिरोंचा येथील १२, मुलचेरातील ३, देसाईगंज येथील ६ आणि कोरची येथील एका जण गुरूवारी पॉझिटिव्ह आढळला.

आणखी ११० जणांना कोरोनाची बाधा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता बिनधास्त राहण्याचे आणि त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचे परिणाम आता पुढे येऊ लागले आहे. गुरूवारी (दि.१०) तब्बल ११० जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. विविध पोलीस दलातील जवानांचा एकत्रित अहवालाचा अपवाद सोडल्यास सामान्य नागरिकांमधून पहिल्यांदाच एवढ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे एका कोरोनाबाधित आरोग्य कर्मचाऱ्याचा कुरखेडा येथे मृत्यूही झाला आहे.
नवीन कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली येथील वेगवेगळया ठिकाणी कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कातील तीव्र जोखमीचे ३९ जण कोरोनाबाधित आढळून आले. याशिवाय चामोर्शी येथील २३, अहेरीतील ३, आरमोरीतील २ जणांचा समावेश आहे. तसेच धानोरातील १४, कुरखेडा येथील ७, सिरोंचा येथील १२, मुलचेरातील ३, देसाईगंज येथील ६ आणि कोरची येथील एका जण गुरूवारी पॉझिटिव्ह आढळला. असे एकूण ११० जण नवीन कोरोनारुग्ण आढळले आहेत.
आता जिल्हयातील क्रियाशिल कोरोनाबाधितांची संख्या २९५ झाली आहे. याशिवाय एकूण रुग्णसंख्या १४५९ झाली आहे. आतापर्यंत ११६३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मृत्यूनंतर केली कोरोना चाचणी
कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयातील एका ५० वर्षीय कर्मचाऱ्याचा सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. मृत्यूनंतर या कर्मचाºयाची अॅन्टीजन कोरोना चाचणी करण्यात आली ती सकारात्मक मिळाली. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यावर प्रशासनाकडून आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत पीपीई कीट घालून सती नदीच्या घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले.
गडचिरोलीतील उद्रेकासाठी जबाबदार कोण?
नवीन बाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण गडचिरोली शहरातील आहेत. नागरिक सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आणि अंतर ठेवून राहण्याच्या नियमांना बगल देत आहेत. पण प्रशासकीय यंत्रणेने जणू त्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गडचिरोली शहरात कोरोनाचा उद्रेक होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष कारणीभूत ठरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
५९ जण कोरोनामुक्त
क्रियाशिल कोरोनाबाधितांपैकी गुरूवारी जिल्ह्यात ५९ जण कोरोनामुक्त झाले. त्यामध्ये गडचिरोली येथील २२, चामोर्शी येथील ९, आरमोरी ३, सिरोंचा ४, अहेरी ३, कुरखेडा १५, धानोरा ३ व मुलचेरा येथील एका जणाचा समावेश आहे.