शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 6:00 AM

२५ जुलैपासून दमदार पावसाला सुरूवात झाली. २५ जुलै ते ३ सप्टेंबर या जळपास सव्वा महिन्याच्या कालावधीत अपवाद वगळता प्रत्येक दिवशी पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देपाच वर्षातील सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता : पावसाळा संपण्याच्या महिनाभर आधीच १४२७ मिमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरी १३५४.७ मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी सुरूवातीपासूनच दमदार पाऊस झाल्याने यावर्षीचा पावसाळा संपण्यास महिनाभराचा कालावधी शिल्लक असतानाच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. आतापर्यंत जिल्ह्यात १४२७.२ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या १०५.३५ टक्के आहे.पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास सप्टेंबर अखेरपर्यंत मागील पाच वर्षातील रेकॉर्ड तुटेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.२५ जुलैपासून दमदार पावसाला सुरूवात झाली. २५ जुलै ते ३ सप्टेंबर या जळपास सव्वा महिन्याच्या कालावधीत अपवाद वगळता प्रत्येक दिवशी पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत २०१४ मध्ये ११२९.९ मिमी, २०१५ मध्ये १००० मिमी, २०१६ मध्ये १५२६ मिमी, २०१७ मध्ये ८६४.२ मिमी, २०१८ मध्ये १३१५.७ मिमी पाऊस पडला आहे.३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ११५९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात १४२७.२ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या सुमारे १२३.१३ मिमी पाऊस झाला आहे. सोमवारी व मंगळवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे मार्ग बंद पडले होते. पर्लकोटा नदी पुलावर पाणी चढल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला होता. भामरागड तालुक्याने सुध्दा यावर्षी पावसाच्या कहराचा अनुभव अवलंबला. एटापल्ली तालुक्यातीलही नदी, नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांची वाट अडविली होती. सततच्या पावसामुळे सोयाबिन, कापूस पिके धोक्यात आली आहेत. अनेक शेतातील पिके पिवळी पडली असल्याचे दिसत आहे.अतिवृष्टीचा इशारागडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ४ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय यंत्रोला सतर्क राहून खबदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाऊस सुरू असताना घराबाहेर पडताना नागरिकांनी उचीत काळजी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरू असल्यास शेतात जाऊ नये, असे कळविले आहे.दोराच्या मदतीने ओलांडला पूलभामरागड-आलापल्ली मार्गावरील तुमरगुडा नाल्याच्या पुलावरून मंगळवारी सकाळी १० वाजता पाणी चढले. पाणी कमी होण्याची प्रतीक्षा करीत जवळपास ५० प्रवाशी थांबनू होते. मात्र कमी होण्याऐवजी वाढू लागला. त्यामुळे संबंधित प्रवाशी ताडगावकडे परत जाण्यासाठी निघाले. मात्र ताडगावजवळचा नाला सुध्दा भरला होता. त्यामुळे ताडगाव येथेही पोहोचणे कठीण होते. रात्र जंगलातच काढण्याची आपत्ती निर्माण झाली होती. ही बाब ताडगाव येथील व्यापारी, नागरिक व पोलिसांना माहित झाल्यानंतर त्यांनी ताडगाव जवळचा नाला गाठला. नाल्याच्या दोन्ही बाजुला दोर बांधून पुलावरून पाणी असतानाही प्रवाशांना ताडगावकडे सुखरूप बाहेर काढले. त्यांच्या जेवन व निवासाची व्यवस्था सुध्दा केली.

टॅग्स :Rainपाऊस