आमगावच्या सरपंचपदी अनिल चंडीकार
By Admin | Updated: May 18, 2015 01:47 IST2015-05-18T01:47:52+5:302015-05-18T01:47:52+5:30
तालुक्यातील आमगाव ग्राम पंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली

आमगावच्या सरपंचपदी अनिल चंडीकार
देसाईगंज : तालुक्यातील आमगाव ग्राम पंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीत सरपंचपदी अनिल रामकृष्ण चंडीकार व उपसरपंच म्हणून योगेश पुरूषोत्तम नागतोडे यांची अविरोध निवड झाली आहे. नवनिर्वाचित सदस्य म्हणून अनिल निकम, वासंती वसंत देशमुख, संगीता नंदू झरकर, लता शंकर सिद्धमवार, बेबीनंदा शैलेश पाटील, सूमन जनार्धन साखरे, गीताबाई रामचंद्र भोयर, शुभांगी संतोष कवासे या निवडून आल्या आहेत. (प्रतिनिधी)