शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त बोरीवासीयांनी ग्रामपंचायतला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 05:01 IST

सन २०१५ ते २०२० या पाच वर्षांच्या कालावधीत शासकीय  योजनांमधून विविध कामे झाली आहेत. ग्रामस्थांनी आमसभेत मागितलेल्या कामांचा जमाखर्चाचा हिशोब ग्रामपंचायतीने नागरिकपुढे ठेवल्याशिवाय सरपंच पदाची निवडणूक होऊ देणार नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला होता. यासंदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगार यांना दि. ९ फेब्रुवारीला निवेदन देण्यात आले होते. 

ठळक मुद्देग्रामसेवक, सरपंचाने विकासकामांच्या निधीचा हिशेब न दिल्याचे कारण

लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुक्यातील बोरी येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंचाला विकासकामांच्या निधीचा हिशेब ग्रामसभेत अनेकदा मागीतला हाेता, मात्र  हिशेब न  मिळाल्याने सरपंचपदाच्या निवडणुकीला विरोध दर्शवित कोरचीपासून १२ किमी  अंतरावर येत असलेल्या  बोरी गावातील संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीला १२ फेब्रुवारीला  पहाटे ४ वाजताच कुलूप ठोकले. सन २०१५ ते २०२० या पाच वर्षांच्या कालावधीत शासकीय  योजनांमधून विविध कामे झाली आहेत. ग्रामस्थांनी आमसभेत मागितलेल्या कामांचा जमाखर्चाचा हिशोब ग्रामपंचायतीने नागरिकपुढे ठेवल्याशिवाय सरपंच पदाची निवडणूक होऊ देणार नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला होता. यासंदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगार यांना दि. ९ फेब्रुवारीला निवेदन देण्यात आले होते. शुक्रवारी होत असलेल्या सरपंच उपसरपंच  निवडणुकीसाठी पोलिसांनी सकाळी बोरी ग्रामपंचायतला चोख बंदोबस्त ठेवला. यामध्ये पोलिसांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण नागरिक समजण्यास तयार नव्हते. यानंतर दहा वाजताच्या सुमारास तहसीलदार छगनलाल भंडारी, नायब तहसीलदार रेखा बोक्के  व पटवारी, कोतवाल कर्मचारी यांनी गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आपल्याला झालेल्या सर्वच कामाचा हिशेब १८ तारखेच्या चौकशीत नक्की देणार, पण निवडणूक होऊ द्या, असे आश्वासन दिले. परंतु येथील  नागरिकांनी ते मान्य केले नाही. पंचायत समिती सवर्ग विकास अधिकारी देवीदास देवरे, विस्तार अधिकारी राजेश फाये ग्रामपंचायतस्थळी आले. या प्रकरणाची चाैकशी केली जाईल, असे आश्वासन तहसीलदारांनी नवनियुक्त सदस्यांना दिल्याने त्यांचे समाधान झाले.

सरपंचपदासाठी शनिवारी अर्जसरपंच पदासाठी शुक्रवारी निवडणूक हाेती. मात्र ग्रामपंचायतीला कुलूप ठाेकल्याने दिवसभर गाेंधळ उडाला हाेता. त्यामुळे शनिवारी निवड घेतली जाईल, अशी माहिती तहसीलदार छगणलाल भंडारी यांनी फाेनवरून दिली आहे. मतदानाची प्रक्रिया शांतते पार पडेल, अशी अपेक्षा आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत