मानधनासाठी अंगणवाडी सेविका जाणार कोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 22:33 IST2017-12-08T22:33:36+5:302017-12-08T22:33:54+5:30
अहेरी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या मिनी अंगणवाडीतील सेविकांचे मानधन प्रलंबित आहे.

मानधनासाठी अंगणवाडी सेविका जाणार कोर्टात
आॅनलाईन लोकमत
आलापल्ली : अहेरी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या मिनी अंगणवाडीतील सेविकांचे मानधन प्रलंबित आहे. मानधन मिळत नसल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या प्रश्नावर दाद मागण्यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून न्यायालयात जाणार असा, इशारा अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी दिला.
अहेरी प्रकल्पातील अंगणवाडी महिला कार्यकर्त्यांची बैठक आलापल्लीत रत्नमाला चालुरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला छाया कोतकोंडावार, संगीता वडलाकोंडावार, उईके, सुरेखा कन्नमवार आदींसह बहुसंख्य अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
प्रास्ताविक माया नैनुरवार तर आभार छाया कोतकोंडावार यांनी मानले. अंगणवाडी महिलांच्या प्रश्नाला घेऊन १२ डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.