शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

-तर दारूड्यांना हाकलून लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 1:15 AM

गावात दारू मिळत नसल्याने काही जण धानोरा येथे जाऊन दारू पिऊन येतात. तर काही जण दारूचा काही साठा सोबत घेऊन येतात. त्याचबरोबर लपून-छपून गावाबाहेर काही जण दारूची विक्री करतात. अशांवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांना शेवटची समज दिली जाणार आहे.

ठळक मुद्देकाकडयेली गावाचा निर्णय : निवडणुकीदरम्यान दारूला पूर्णपणे करणार हद्दपार

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : गावात दारू मिळत नसल्याने काही जण धानोरा येथे जाऊन दारू पिऊन येतात. तर काही जण दारूचा काही साठा सोबत घेऊन येतात. त्याचबरोबर लपून-छपून गावाबाहेर काही जण दारूची विक्री करतात. अशांवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांना शेवटची समज दिली जाणार आहे. यानंतरही दारू पिणे व विक्री करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवल्यास संबंधित व्यक्तीला गावाबाहेर हाकलून लावण्याचा निर्णय काकडयेली ग्रामसभेने शुक्रवारी घेतला.धानोरा तालुक्यातील काकडयेली येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान दारूला पूर्णत: हद्दपार करण्याचा निर्णय पेसा ग्रामसभेत घेतला. यासह गावातील इतरही समस्यांचा न्यायनिवाडा केला.शंभर टक्के आदिवासी असलेल्या काकडयेली या गावाने संपूर्ण दारूविक्री बंदीचा ठराव घेतला आहे. विक्री पूर्णत: बंद राहण्यासाठी महिला व पुरुष आजही प्रयत्नशील आहेत. पण बंदी असतानाही गावातील काही जण लपून-छपून दारूची विक्री करीत असल्याचे महिलांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अशांवर कठोर कारवाई करण्याबाबत या सभेत चर्चा झाली. हे विक्रेते दारू विकत घेणाऱ्यास हेटी, धानोरा टोला, खरकाडी या गावाहून दारू विकत आणली असे सांगण्यास सांगतात. तर काही जण खरोखर या गावांहून पिऊन येतात. त्यामुळे या गावांमध्ये जाऊन काकडयेलीचा कोणीही माणूस दारू विकत घेण्यासाठी वा पिण्यासाठी आल्यास त्याला दारू विकू नये, असे सांगण्यासंदर्भात कृती करण्याचा निर्णयही ग्रामसभेत झाला.निवडणुकीत दारूचे आमिष दाखवून लोकांची मते मिळविण्याचा प्रयत्न उमेदवार करतात. त्यामुळे आपले अमूल्य मत दारूच्या चार थेंबांसाठी न विकण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दारूविक्रेत्यांना मदत करणाऱ्या उमेदवारांना सहकार्य न करण्याचा निर्णयही ग्रामसभेत घेण्यात आला. ग्रामसभेला पोलीस पाटील, पेसा ग्रामसभेचे अध्यक्ष, तालुका मुक्तिपथ चमू व नागरिक हजर होते.

टॅग्स :liquor banदारूबंदीElectionनिवडणूक