परिवहन विभागाने निश्चित केले रुग्णवाहिकेचे दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:27 IST2021-04-29T04:27:55+5:302021-04-29T04:27:55+5:30
१०० किलोमीटर किंवा २४ तासाकरीता रुग्णवाहिकांचे भाडेदर पुढील प्रमाणे आहेत. मारुती १५०० रुपये, टाटा सुमो-१७०० रुपये, विंगर- १९०० रुपये, ...

परिवहन विभागाने निश्चित केले रुग्णवाहिकेचे दर
१०० किलोमीटर किंवा २४ तासाकरीता रुग्णवाहिकांचे भाडेदर पुढील प्रमाणे आहेत. मारुती १५०० रुपये, टाटा सुमो-१७०० रुपये, विंगर- १९०० रुपये, ट्रॅव्हलर- २००० रुपये, वातानुकुलीत यंत्रणा वाहनात बसविली असल्यास नमुद दरामध्ये १० टक्के वाढ राहणार आहे. तसेच त्यानंतर प्रतिकिलोमीटर दर पुढीलप्रमाणे असतील. मारुती-९ रुपये, टाटा सुमो- १० रु., विंगर -११ रु., ट्रॅव्हलर-१३ रु., वातानुकुलीत यंत्रणा वाहनात असल्यास नमुद दरामध्ये १० टक्के वाढ.
हायटेक किंवा अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्जित रुग्णवाहिकांच्या दरात वर नमुद दरापेक्षा ५० टक्के वाढ असेल. डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांच्याकरिता येणारा खर्च जी व्यक्ती किंवा संस्था रुग्णवाहिका भाड्याने घेईल त्यांना करावा लागणार आहे.
या दरापेक्षा जास्त दर आकारल्याचे निदर्शनास आल्यास किंवा तशी तक्रार प्राप्त झाल्यास सदर रुग्णवाहिका ज्या व्यक्तीच्या नावाने नोंदणीकृत असेल त्या व्यक्तीवर किंवा संस्थेवर आणि वाहनावर मोटार वाहन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले.