रुग्णाला आणण्यासाठी जाणारी रुग्णवाहिका उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST2019-10-24T06:00:00+5:302019-10-24T06:00:43+5:30

आमगाव (म.) चे आरोग्यसेवक लाकडे व रेखेगावचे आरोग्यसेवक मडावी अशी किरकोळ जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. मानव विकास मिशन अंतर्गत आमगाव (म.) आरोग्य केंद्रात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी महिलांना आणण्यासाठी एमएच-३३-४७४२ क्रमांकाची रुग्णवाहिका निमडर टोला येथे जात होती.

The ambulance leading to the patient was reversed | रुग्णाला आणण्यासाठी जाणारी रुग्णवाहिका उलटली

रुग्णाला आणण्यासाठी जाणारी रुग्णवाहिका उलटली

ठळक मुद्देअनंतपूर गावानजीकची घटना : दोन कर्मचारी किरकोळ जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव (म.) : चामोर्शी तालुक्याच्या आमगाव (म.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका शिबिरासाठी महिलांना आणण्यासाठी जात असताना चालकाचा तोल गेल्याने ही रुग्णवाहिका उलटून दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. ही घटना बुधवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास अनंतपूर-निमडर टोला मार्गावर घडली.
आमगाव (म.) चे आरोग्यसेवक लाकडे व रेखेगावचे आरोग्यसेवक मडावी अशी किरकोळ जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. मानव विकास मिशन अंतर्गत आमगाव (म.) आरोग्य केंद्रात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी महिलांना आणण्यासाठी एमएच-३३-४७४२ क्रमांकाची रुग्णवाहिका निमडर टोला येथे जात होती. दरम्यान वाहनचालक अविनाश टिकले याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने निमडर टोला मार्गावर अनंतरपूर गावाजवळ रस्त्याच्या बाजूला ही रुग्णवाहिका उलटली. यात मोठी हाणी झाली नाही. मात्र वाहन क्षतिग्रस्त झाले.

Web Title: The ambulance leading to the patient was reversed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात