कोरोनामुळे तणाव वाढला तरी आत्महत्या घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:40 IST2021-04-28T04:40:12+5:302021-04-28T04:40:12+5:30

संकट माझ्या एकट्यावर नाही - २०२० मध्ये निर्माण झालेेले कोरोनाचे संकट अनेकांसाठी अनपेक्षित धक्का देणारे होते. अनेकांनी जवळचे ...

Although corona increased stress, suicides decreased | कोरोनामुळे तणाव वाढला तरी आत्महत्या घटल्या

कोरोनामुळे तणाव वाढला तरी आत्महत्या घटल्या

संकट माझ्या एकट्यावर नाही

- २०२० मध्ये निर्माण झालेेले कोरोनाचे संकट अनेकांसाठी अनपेक्षित धक्का देणारे होते. अनेकांनी जवळचे नातेवाईक गमावले. त्याहीपेक्षा कोरोनाने बदललेल्या जीवनशैलीत स्वत:ला ॲडजस्ट करणे ज्यांना जमले नाही त्यांना खूप त्रास झाला. आर्थिक अडचणीतून अनेक समस्या उद्‌भवल्या. त्यामुळे २०२० मध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले.

- २०२१ मध्ये कोरोनाचे संकट कायम असले तरी या संकटाशी जुळवून घेण्याची लोकांची मानसिक तयारी झाली आहे. विशेष म्हणजे हे संकट माझ्या एकट्यावर नाही तर माझ्यासारखे अनेक जण याच समस्येला तोंड देत आहेत, या भावनेतून कोणत्याही संकटाची तीव्रता कमी होते. म्हणून यावर्षी आत्महत्या कमी दिसत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.

गेल्या वर्षीच्या तुलनेत लोक झाले खंबीर

२०२० च्या अखेरीस कोरोना आता संपणार, असे चित्र निर्माण झाले होते; पण २०२१ उजाडल्यानंतर चित्र बदलले. त्यासोबत कसेतरी रुळावर येत असलेले अर्थचक्र पुन्हा उलटे फिरणे सुरू झाले. असे असले तरी लोक आता अधिक खंबीर झाल्याचे दिसून येते. यावर्षी ४ महिन्यांत झालेल्या आत्महत्यांमध्ये कोरोनामुळे झालेल्या आत्महत्यांचे प्रमाण फारच कमी आहे.

Web Title: Although corona increased stress, suicides decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.