शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची खरीपपूर्व कामांसाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST

जेमतेम दीड महिन्याचा कालावधी खरीप हंगाम सुरू होण्यासाठी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी सध्या जमिनीची सुपीकता वाढावी यासाठी शेणखत टाकण्याचे ...

जेमतेम दीड महिन्याचा कालावधी खरीप हंगाम सुरू होण्यासाठी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी सध्या जमिनीची सुपीकता वाढावी यासाठी शेणखत टाकण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी काही शेतकरी पहाटेपासून बैलबंडीने शेणखत घेऊन जात असतात तर काही शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतातील भातखाचरात शेणखताचे ढिगारे टाकून ठेवत आहेत तर काही शेतकरी शेतातील निरुपयोगी केरकचरा जाळून जमिनीची साफसफाई करीत आहेत. या कामासाठी दोन पाळीत काम करताना दिसून येत आहेत. सध्या वातावरण चांगले दिसून येत असल्याने शेतकरी सूर्य मध्यावर येईपर्यंत शेतात काम करताना दिसून येत आहेत.

दरवर्षी शेतकरी शेतातील पाऱ्या धुऱ्याचे मातीकाम करून शेतजमीन चांगली करीत असतात. सध्या शेतात मातीकाम करताना दिसून येत आहेत. यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे. यासाठी प्रति तास ५०० ते ६०० रुपये टॅक्टर मालक घेत आहेत. त्यामुळे त्यांना हंगामी स्वरूपात गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे. सध्या सगळीकडे कोरोनाची चिंता असताना बळीराजा मात्र सर्व चिंता बाजूला सारून शेतातील कामे करण्यात मग्न झालेला दिसून येत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना उत्पादन घटीचा जबर फटका बसला मात्र यातून सावरत कसा बसा पुन्हा नव्या उमेदीने शेतातील कामे करण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे.

बाॅक्स..

यंदा समाधानकारक पावसाची शक्यता

शेतकरी दरवर्षी शेतातील कामे ठरलेल्या वेळेच्या आत करून पावसाची वाट बघत असतात. यावर्षी कोरोना या अभूतपूर्व संकटातही स्कायमेंट या हवामान अंदाजानुसार समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. जिल्ह्यातील शेती पाण्यावर अवलंबून आहे त्यामुळे शेतकरी दरवर्षी चांगल्या पावसाची आस धरून असतात मात्र निसर्ग कधी शेतकऱ्यांना ऐन हंगामात हुलकावणी देत असतो तरी शेतकरी शेतातून पीक येईल ही आशा बाळगत पीक लागवड करीत असतो.