उडेरात नक्षल सदस्यांच्या कुटुंबाला साहित्य वाटप
By Admin | Updated: December 17, 2015 01:32 IST2015-12-17T01:32:08+5:302015-12-17T01:32:08+5:30
तालुक्यातील बुर्गी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या उडेरा गावात नक्षल सदस्यांच्या कुटुंबीयांना विविध वस्तूंचे वाटप पोलिसांच्या वतीने करण्यात आले.

उडेरात नक्षल सदस्यांच्या कुटुंबाला साहित्य वाटप
एटापल्ली : तालुक्यातील बुर्गी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या उडेरा गावात नक्षल सदस्यांच्या कुटुंबीयांना विविध वस्तूंचे वाटप पोलिसांच्या वतीने करण्यात आले.
नवजीवन योजनेंतर्गत उडेरा येथील सक्रीय नक्षल सदस्य विज्या बाजू गावडे व आत्मसमर्पित नक्षल सदस्य राजकुमार सागर गावडे यांच्या कुटुंबीयांची बुर्गी पोलिसांनी भेट घेतली. त्यानंतर कुटुंबीयांना साहित्य वाटप करण्यात आले. बुर्गी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी डी. जी. तलेदवार यांच्या हस्ते कुटुंबीयांना कपडे तसेच कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू तसेच उपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या. प्रभारी अधिकारी डी. जी. तलेदवार यांनी नवजीवन योजनेचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. विज्या गावडे याला नक्षल चळवळ सोडून आत्मसमर्पण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता प्रोत्साहित करा, असे आवाहनही प्रभारी अधिकारी तलेदवार यांनी कुटुंबाला केले. दरम्यान, आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती यावेळी पोलिसांच्या वतीने देण्यात आली.